ATM मोफत व्यवहाराची मर्यादा
केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या ATM मधून दरमहा 5 मोफत व्यवहार (आर्थिक आणि बिगर-आर्थिक दोन्ही) करण्याची परवानगी असेल.
-इतर बँकांच्या ATM मधून मेट्रो शहरांमध्ये 3 मोफत व्यवहार
-बिगर-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येणार आहेत.
शेअर बाजारामुळे कुटुंब उध्वस्त, कॉन्स्टेबलच्या पत्नीने कर्ज काढून पैसे गुंतवले
advertisement
ATM व्यवहार शुल्कात वाढ का?
इकॉनॉमिक टाईम्सच्या (ET) अहवालानुसार, RBI आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी ATM इंटरचेंज फीमध्ये 2 वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
-NPCI ने 13 मार्च रोजी सर्व सदस्य बँकांना या बदलाबाबत कळवले आहे.
-1 मे 2025 पासून ही नवीन फी लागू केली जाईल.
सरकारकडून कर्मचाऱ्यांना गिफ्ट, DA दोन टक्क्यांनी वाढवला; पाहा पगार किती होणार
ATM इंटरचेंज फी किती?
6 मार्च 2024 रोजी नॅशनल फायनान्शियल स्विच स्टीयरिंग कमिटीने ATM मधून पैसे काढण्यासाठी इंटरचेंज फी 19 वर नेण्यास मान्यता दिली. नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठी 7 शुल्क आकारले जाणार आहे.
GST स्वतंत्रपणे लागू होणार
ही सुधारित शुल्क रचना वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केल्यानंतर अंतिम आकारामध्ये दिसेल.
EPFO खातेदारांसाठी क्रांतिकारी निर्णय; PFचे पैसे थेट ATM, UPIद्वारे काढता येणार
NPCI आणि RBI चा निर्णय
11 मार्च रोजी RBI ने NPCI ला कळवले होते की ATM नेटवर्कला इंटरचेंज फी ठरवण्याचा अधिकार आहे. NPCI ने ही सुधारित शुल्करचना सर्व बँकांना 13 मार्चला कळवली आणि 1 मे 2025 पासून अंमलबजावणी होईल, असे ET च्या अहवालात नमूद आहे.
ग्राहकांवर होणारा परिणाम
-मोफत व्यवहारांनंतर ग्राहकांना ATM व्यवहारांसाठी 23 शुल्क द्यावे लागेल.
-नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठीही शुल्क लागू होईल.
-ग्राहकांनी ATM व्यवहारांची योग्य नियोजन करून अतिरिक्त शुल्क टाळावे.
1 मे 2025 पासून हा बदल लागू होणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आता आपल्या बँकिंग सवयी बदलाव्या लागणार आहेत.
