रोज वाढत जाणारी ग्राहकसंख्या, सतत मिळणाऱ्या ऑर्डर्स आणि अगदी तोंडी प्रसारामुळे तिच्या चीजकेकची लोकप्रियता वेगाने वाढत गेली. आज दादरमध्ये तिचे साक्षीस केक नावाचे स्वतंत्र शॉप सुरू झाले असून येथे ती स्वतः बनवलेले केक बाउल, वॉफल विकते.
advertisement
विशेष म्हणजे दुकान सुरू झाले असले तरीही साक्षीने आपला सुरुवातीचा संघर्ष कधीच विसरलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून ती शिवाजी पार्कजवळचा मूळ चीजकेक स्टॉल आजही त्याच जागी लावत आहे. या स्टॉलवर तिची आई बसते तर साक्षी दुकान पाहते. दोन्ही व्यवसाय हाताळताना ती अत्यंत उत्साहाने आणि दक्षतेने काम करते आणि याच व्यवसायातून साक्षी दरमहा 60 ते 70 हजार कमवते.
आपल्या यशाच्या प्रवासाबद्दल बोलताना साक्षी म्हणते, अडचणी खूप आल्या, कधी निराशा आली, कधी थकवा जाणवला. पण मी हार मानली नाही. माझ्या आई-वडिलांनी, मित्रांनी आणि ग्राहकांनी मला सतत पाठिंबा दिला म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचले.
संपूर्ण कुटुंबात व्यवसाय करणारी ती पहिली मुलगी असल्याने तिच्या यशाचा तिच्या आई-वडिलांना अभिमान आहे. आज मी स्वतः इंडिपेंडेंट वुमन झाले आहे आणि मला स्वतःवरही प्रचंड गर्व वाटतो, असे साक्षी भावूक होत सांगते. उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरुणांना संदेश देताना साक्षी सांगते, बिझनेस सगळे करतात पण स्वतःच्या अनोख्या आयडियाने करत असाल तर यश नक्की मिळते. धैर्य ठेवा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
साक्षी बोंगार्डेचा प्रवास हा ठाम इच्छाशक्ती, मेहनत आणि न थांबणाऱ्या स्वप्नांचा सुंदर संगम आहे आणि अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शकही.