SBI ने काय बदल केले?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या बचत खात्यातील किमान शिल्लक मर्यादा 50000 रुपये केली आहे. जी पूर्वी 35,000 रुपये होती. आता 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आपोआप एफडी (एमओडी डिपॉझिट) मध्ये रूपांतरित होईल.
इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचा विचार करताय? या 5 गोष्टी कधीच विसरु नका
advertisement
MOD स्कीम कशी काम करते?
ऑटो स्वीप: मर्यादेपेक्षा जास्त रक्कम 1000 रुपयांच्या युनिट्समध्ये FDमध्ये रूपांतरित होते.
चांगले रिटर्न: या MOD डिपॉजिट्स मुदत ठेवींप्रमाणेच व्याजदर देतात, जे बचत खात्यांपेक्षा जास्त आहे.
निधीची सुलभ उपलब्धता: बॅलेन्स कमी झाल्यावर SBI आपोआप MODमधून बचत खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करते.
15 सप्टेंबर शेवटची तारीख! CA शिवाय मोबाईलवर कसा झटपट भरायचा ITR?
ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ देखील मिळतो
ग्राहकांवर परिणाम
35000–50000 रुपयांपर्यंत शिल्लक ठेवणाऱ्या ग्राहकांना आता ऑटो स्वीपचा लाभ मिळणार नाही म्हणून कमी शिल्लक असलेल्या ग्राहकांनाही याचा परिणाम होईल. मध्यम आणि मोठ्या शिल्लक असलेल्या ग्राहकांसाठी, ही योजना पूर्वीसारखीच फायदेशीर राहील.
लिक्विडिटी + रिटर्नचे कॉम्बिनेशन: मोठे बॅलेन्स असलेल्या ग्राहकांसाठी, ही स्किम बचतीतून जास्त कमाई आणि FD सारखी सुरक्षितता दोन्ही देते.
शेअर बाजार आणि भारतावर परिणाम
त्याचा बँकिंग क्षेत्रावर परिणाम होईल. हे पाऊल SBIच्या डिपॉझिट कॉस्ट मॅनेजमेंट रणनितीचा एक भाग आहे. ज्यामुळे लहान बॅलेन्स रकमेचे एफडीमध्ये रूपांतर होण्यापासून रोखले जाईल. किरकोळ ग्राहकांना असे वाटेल की छोट्या बॅलेन्स धारकांसाठी कमाईचा एक सोपा मार्ग बंद झाला आहे. मोठ्या खातेधारकांना कोणताही फरक पडणार नाही, उलट त्यांना चांगल्या व्याजाचा फायदा मिळत राहील.