TRENDING:

Kidney For...: किडनी विका,पण संधी सोडू नका; 'तुघलकी' सल्ला कोणी दिला? गुंतवणूकदार हादरले

Last Updated:

Bitcoin For Kidney: क्रिप्टोचे समर्थक मायकेल सेलर यांनी 2021 साली बिटकॉइन खरेदीसाठी घर गहाण ठेवण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांनी थेट गरज पडली तर किडनी विकण्याचा सल्ला दिला आहे.

advertisement
नवी दिल्ली: जागतीक स्तरावरील अस्थिरतेमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या ५ महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. बाजारातील या अस्थिरतेमुळे सोने महाग झाले आहे. तर दुसर्‍या बाजूला गेल्या काही वर्षात चर्चेत आलेली क्रिप्टोकरन्सी ट्रेंडमध्ये आली आहे. सध्या क्रिप्टोकरन्सी पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण थोडे वेगळे आहे.
News18
News18
advertisement

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर बिटकॉइनची मागणी वाढताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रोस्ट्रॅटेजी (MicroStrategy) कंपनीचे को-फाउंडर मायकेल सेलर (Michael Saylor) यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले असून त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

बँकेची Galti Se Mistake; अकाउंटमध्ये चुकून जमा केले 70 लाख कोटी, चूक लक्षात आली

advertisement

काय म्हणाले मायकेल सेलर?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत त्यांनी बिटकॉइनच्या घसरणीवर एक विचित्र सल्ला दिला. त्यांनी म्हटले आहे की, गरज पडल्यास किडनी विका, पण बिटकॉइन विकत घ्या. त्यांच्या या विधानावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या पोस्टला वादग्रस्त म्हणत डोक ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारला आहे.

advertisement

किडनी विकून खरेदीचा ट्रेंड पुन्हा चर्चेत

भारतात काही वर्षांपूर्वी आयफोन खरेदीसाठी लोक किडनी विकण्याच्या जोक आणि मीम्स चर्चेत होते. आता बिटकॉइन खरेदीसाठीही अशाच चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या एका बिटकॉइनची किंमत सुमारे 74 लाख रुपये आहे.

बाजारातील महाभयंकर 'मॅडनेस'ने लावला १८ लाख कोटींचा चुना; डोळ्यांसमोर उडाला पैसा!

बिटकॉइनमध्ये मोठी घसरण

advertisement

गेल्या काही दिवसांत बिटकॉइनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता त्याची किंमत 74 लाख रुपये होती, जी महिनाभरापूर्वी 88 लाखांहून अधिक होती. मागील महिन्यात बिटकॉइनमध्ये 16% पेक्षा जास्त घसरण झाली आहे, तर केवळ 5 दिवसांतच त्याची किंमत 7% ने घसरली आहे. वाढती महागाई आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे ही घसरण होत असल्याचे बोलले जात आहे.

advertisement

जोरदार टीका

मायकेल सेलर हे क्रिप्टोचे मोठे समर्थक मानले जातात. मात्र त्यांचे किडनी विकून बिटकॉइन खरेदी करा, हे वक्तव्य अनेकांना हास्यास्पद आणि बेजबाबदार वाटले. 2021 मध्येही त्यांनी लोकांना बिटकॉइन खरेदीसाठी आपली घरे गहाण ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, 2022 मध्ये बिटकॉइन कोसळल्यानंतर त्यांचे वक्तव्य चुकीचे ठरले.

मराठी बातम्या/मनी/
Kidney For...: किडनी विका,पण संधी सोडू नका; 'तुघलकी' सल्ला कोणी दिला? गुंतवणूकदार हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल