TRENDING:

Share Market: ट्रम्प यांचा निर्णय आणि शेअर मार्केटमध्ये हाहाकार! एका तासात 9 लाख कोटींचा चुराडा, असं काय घडलं?

Last Updated:

Share market: एकीकडे बजेट तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Share Market News: भारताच्या शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली. सेंसेक्स 800 अंकांनी आणि निफ्टी 250 अंकांनी कोसळला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 9 लाख कोटी रुपये बुडाले. बजेटआधी एवढं मोठं नुकसान झाल्याने गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. बजेटनंतर मार्केट रिकव्हर होणार की आणखी कोसळणार याची धास्ती लागून आहे. एकीकडे बजेट तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Share Market: ट्रम्प यांचा निर्णय आणि शेअर मार्केटमध्ये हाहाकार! एका तासात 9 लाख कोटींचा चुराडा, असं काय घडलं?
Share Market: ट्रम्प यांचा निर्णय आणि शेअर मार्केटमध्ये हाहाकार! एका तासात 9 लाख कोटींचा चुराडा, असं काय घडलं?
advertisement

सोमवारी बिकट परिस्थिती

सोमवारी सकाळी बाजार उघडताच मोठी घसरण झाली. सेंसेक्स 75,700.43 वरून 842 अंकांनी कोसळून 75,434 वर पोहोचला, तर निफ्टीने 265 अंकांची घसरण अनुभवली. सकाळी 11 वाजेपर्यंत निफ्टी 22,854 अंकांवर स्थिरावला.

विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा फटका

FPI (Foreign Portfolio Investors) यांनी जानेवारी 2025 मध्ये 64,156 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. यामुळे बाजारात सतत घसरण होत असून गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. कमजोर कॉर्पोरेट निकाल, अमेरिकन व्यापार धोरणे, आणि विदेशी गुंतवणुकीची सततची विक्री ही या पडझडीची मुख्य कारणं आहेत.

advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा प्रभाव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ वाढवण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिक्स देशांवर 100% टॅरिफ, तसेच कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली. या नवनवीन निर्णयांमुळे जागतिक बाजारातही घसरण झाली असून गुंतवणूकदार सावधगिरी बाळगू लागले आहेत.

कोणत्या कंपन्यांना मोठा तोटा?

तोट्यातील शेअर्स: झोमॅटो, HCL टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, अदाणी पोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस.

advertisement

वाढलेले शेअर्स: आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एल अँड टी, नेस्ले इंडिया, एसबीआय, आणि आयटीसी.

शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांसाठी सल्ला

या अनिश्चित काळात ऑनलाइन ट्रेडिंग, SIP (Systematic Investment Plan) सारख्या दीर्घकालीन गुंतवणुकींवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरू शकते. बाजाराची स्थिती सुधारण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी माहिती असलेल्या तज्ज्ञांकडून सल्ला घेणं आवश्यक आहे.

advertisement

फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी केली भविष्यवाणी?

(डिस्क्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: ट्रम्प यांचा निर्णय आणि शेअर मार्केटमध्ये हाहाकार! एका तासात 9 लाख कोटींचा चुराडा, असं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल