Donald Trump : अमेरिकेची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्पचा कार्यक्रम सुरू, 18 हजार भारतीयांच्या हकालपट्टीची तयारी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
चार वर्षांनंतर पुनरागमन करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. सोमवार 20 जानेवारी 2025 ला ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
वॉशिंग्टन : चार वर्षांनंतर पुनरागमन करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. सोमवार 20 जानेवारी 2025 ला ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथ घेताच ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे भारतातून अवैधरित्या अमेरिकेत गेलेल्यांवर टांगती तलवार आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार 18 हजार अवैध भारतीय प्रवासी अमेरिकेहून भारतात परत पाठवले जाणार आहेत. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकमेकांना सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतली अवैध घुसखोरी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा होता. शपथविधी होताच ट्रम्प यांनी अवैध घुसखोरीविरोधात कार्यकारी आदेश जारी केला आहे. 2022 साली अमेरिकेच्या गृह विभागाने यासंबंधीचे आकडे जाहीर केले होते, पण ही प्रक्रिया कशी असेल? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
advertisement
शपथ घेताच ट्रम्प यांची मोठी घोषणा
शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या मोठ्या घोषणा केल्या त्यात अवैध प्रवाशांच्या मुद्द्याचाही समावेश होता. अवैधरित्या अमेरिकेत आलेल्या नागरिकांना कायमचं रोखण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. अमेरिकेमध्ये जवळपास 7.25 लाख भारतीय अवैधरित्या राहत असल्याचा अंदाज आहे. पीयू रिसर्च सेंटरच्या 2022 च्या रिपोर्टनुसार अमेरिकेमध्ये एकूण 10 कोटी 10 लाख लोक अवैधरित्या राहत आहेत.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
'अमेरिका-मॅक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाईल. अवैध प्रवास तातडीने रोखला जाईल आणि लाखो अवैध प्रवाशांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल', असं डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यानंतर म्हणाले होते. यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या प्रवाशांवर टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर भारत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीयांनी जगाच्या कोपऱ्यात कुठेही राहिलं तरी तिथले नियम आणि कायद्याचं पालन करावं, अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump : अमेरिकेची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्पचा कार्यक्रम सुरू, 18 हजार भारतीयांच्या हकालपट्टीची तयारी!