IND vs AUS : 'स्टेडियम ताबडतोब खाली करा...', ब्रिस्बेनमध्ये अलर्ट, भारत-ऑस्ट्रेलिया T20 मध्येच थांबवली!

Last Updated:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा टी-20 सामना अचानक थांबवण्यात आला आहे. मॅच सुरू असतानाच स्टेडियममधल्या स्क्रीनवरून प्रेक्षकांनी स्टेडियम ताबडतोब खाली करावं आणि सुरक्षित ठिकाणी जावं, असा मेसेज देण्यात आला.

'स्टेडियम ताबडतोब खाली करा...', ब्रिस्बेनमध्ये अलर्ट, भारत-ऑस्ट्रेलिया T20 मध्येच थांबवली!
'स्टेडियम ताबडतोब खाली करा...', ब्रिस्बेनमध्ये अलर्ट, भारत-ऑस्ट्रेलिया T20 मध्येच थांबवली!
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा टी-20 सामना अचानक थांबवण्यात आला आहे. मॅच सुरू असतानाच स्टेडियममधल्या स्क्रीनवरून प्रेक्षकांनी स्टेडियम ताबडतोब खाली करावं आणि सुरक्षित ठिकाणी जावं, असा मेसेज देण्यात आला, त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर गेले, तसंच खेळाडूही ड्रेसिंग रूममध्ये गेले.
हवामान खात्याने ब्रिस्बेनमध्ये पुढचे काही तास वीजेच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मॅच थांबवण्यात आली आहे. 'सध्या हवामान खराब आहे, त्यामुळे खुल्या ठिकाणी राहणं धोकादायक आहे, त्यामुळे एखाद्या छपराखाली जाऊन उभे राहा आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करा', असा मेसेज स्टेडियममधल्या मोठ्या स्क्रीनवरून देण्यात आला. या सामन्यासाठी ब्रिस्बेनच्या स्टेडियममधली सगळी तिकीटं विकली गेली होती, त्यामुळे स्टेडियम प्रेक्षकांनी पूर्णपणे भरलेलं आहे.
advertisement
खेळ थांबला तेव्हा भारताचा स्कोअर 4.5 ओव्हरमध्ये 52/0 एवढा आहे. अभिषेक शर्मा 13 बॉल 23 रन आणि शुभमन गिल 16 बॉल 29 रनवर खेळत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारताने त्यांच्या प्लेइिंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. तिलक वर्माऐवजी रिंकू सिंगला संधी मिळाली आहे. संपूर्ण सीरिजमध्ये तिलक वर्माची बॅट शांत राहिली, त्यामुळे या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली.
advertisement
5 टी-20 मॅचच्या या सीरिजचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला, त्यामुळे या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर टीम इंडिया सीरिजही जिंकेल. तसंच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर सीरिज 2-2 ने बरोबरीमध्ये सुटेल.
advertisement

भारताची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

मिचेल मार्श, मॅथ्यू शॉर्ट, जॉश इंग्लिस, टीम डेव्हिड, जॉश फिलीप, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुईस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ऍडम झम्पा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 'स्टेडियम ताबडतोब खाली करा...', ब्रिस्बेनमध्ये अलर्ट, भारत-ऑस्ट्रेलिया T20 मध्येच थांबवली!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement