वाह DK वाह...! दुसऱ्याच बॉलवर घेतली दिनेश कार्तिकने घेतली विकेट, रॉबिन उथप्पाला हसू आवरेना, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hong Kong Sixes Tournament : दिनेश कार्तिकला पहिल्याच ओव्हरमध्ये एक सिक्स बसला. त्यानंतर दिनेश कार्तिकने लगेच कमबॅक केलं. दिनेश कार्तिकने दुसऱ्याच बॉलवर विकेट काढली.
Dinesh Kartik takes wicket Video : हॉन्ग कॉन्ग सिक्सेस टूर्नामेंट 2025 मध्ये दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमची चुनौती समाप्त झाली आहे. पूल-सीच्या एका महत्त्वाच्या सामन्यात कुवैतच्या हातून 27 रन्सने पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करू शकली नाही. 8 नोव्हेंबर रोजी मोंग कॉकच्या मिशन रोड ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात भारताला 107 रन्सचे टार्गेट मिळालं होतं, मात्र भारतीय टीम 5.4 ओव्हर्समध्ये 79 रन्सवर ऑल आऊट झाली. यावेळी टीम इंडियाच्या दिनेश कार्तिकने कमाल केली.
पाचवी ओव्हर टाकली अन्...
दिनेश कार्तिकने कुवेतविरुद्घ पाचवी ओव्हर टाकली. तोपर्यंत कुवेतने 4 ओव्हरमध्ये 51 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकला पहिल्याच ओव्हरमध्ये एक सिक्स बसला. त्यानंतर दिनेश कार्तिकने लगेच कमबॅक केलं. दिनेश कार्तिकने दुसऱ्याच बॉलवर विकेट काढली. शेन वॉर्नसारखा बॉल दिनेश कार्तिकने टाकला अन् बॉल स्पिन झाला. बॅटरने बॉल उचलला अन् विकेटकीपर रॉबिन उथप्पा याने कोणतीही चूक केली नाही.
advertisement
पाहा Video
DK bowling in Super Sixes
I thought I had seen it all already, but nooo pic.twitter.com/pW7hrvSFQZ
— SKIPPER (@skipperjatt) November 8, 2025
कुवेतचा स्को 4 ओव्हर्सनंतर 51 विकेट्सवर 4 होता, पण शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी 55 रन्स खर्च केले, ज्यामुळे कुवेतची टीम 106 विकेट्सवर 5 या स्कोरपर्यंत पोहोचू शकली. दिनेश कार्तिकने आपल्या ओव्हरमध्ये 23 रन्स दिले, तर प्रियांक पांचालने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्ससह 32 रन्स खर्च केले.
advertisement
सामना भारतीय टीमच्या हातातून गेला
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय टीमची सुरुवात खराब झाली. रॉबिन उथप्पा (0 रन) आणि दिनेश कार्तिक (8 रन) दोघेही लवकर आऊट झाले. प्रियांक पांचाल (17 रन), अभिमन्यु मिथुन (26 रन) आणि शाहबाज नदीम (19 रन) या खेळाडूंनी बॅटने काही योगदान दिले. मिथुनने तर शेवटच्या ओव्हरमध्ये लगोपाठ 3 सिक्स मारले, परंतु तोपर्यंत सामना भारतीय टीमच्या हातातून निघून गेला होता. भारतीय टीमने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर डीएलएस नियमानुसार 2 रन्सने विजय मिळवला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 2:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वाह DK वाह...! दुसऱ्याच बॉलवर घेतली दिनेश कार्तिकने घेतली विकेट, रॉबिन उथप्पाला हसू आवरेना, पाहा Video


