TRENDING:

Stocks आणि Mutual SIP कोणती चांगली? काय आहेत फरक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

म्युचुअल फंडमधील एसआयपी चांगली की स्टॉक एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या संदर्भात आपण गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी 
advertisement

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वाढलेले प्रमाण आणि त्याबद्दलच्या वाढलेल्या जागरूकतेमुळे  गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जाताहेत. यामुळं एसआयपीकडे कित्येक लोकांची पाऊल वळताना दिसत आहेत. असाच म्युचुअल फंडातील एसआयपी सोबतच स्टॉक एसआयपी मध्येही बरेच लोक गुंतवणूक करताना दिसत आहेत. मग हा मुद्दा उभा राहतो की म्युचुअल फंडमधील एसआयपी चांगली की स्टॉक एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या संदर्भात आपण गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत.

advertisement

म्युचल फंडमध्ये आपण जेव्हा एसआयपी करतो तेव्हा त्या फंडामध्ये आपण दर महिन्याला गुंतवणूक करतो आणि तो म्युच्युअल फंड आणि जी स्कीम आपण निवडली असेल त्यानुसार इक्विटी डेब्ट मार्केट, बोंड मार्केट अशा पद्धतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतो. तर स्टॉक एसआयपीमध्ये आपण ठराविक शेअरमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवतो आणि त्यामुळं त्याचा लॉन्ग टर्ममध्ये एक पोर्टफोलिओ तयार होतो.

advertisement

एसआयपी की आरडी, कोणती गुंतवणूक फायद्याची?, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

म्युच्युअल फंड एसआयपी आणि स्टॉक फंड एसआयपीमधील फरक काय?

म्युचल फंड एसआयपी आणि स्टॉक एसआयपीमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. त्यामधील पहिला फरक असा की म्युचल फंड हे अतिशय अनुभवी स्किल फुल फंड मॅनेजर मॅनेज करत असतात आणि स्टॉक एसआयपीमध्ये आपण स्वतः आपल्या अभ्यासानुसार शेअर्स निवडतो. म्युचल फंड एसआयपीमध्ये आपण शंभर रुपयापासून सुरुवात करू शकतो आणि लम्समसाठी एक हजार रुपयापासून गुंतवणूक करता येते पण स्टॉक एसआयपीसाठी आपल्याला कमीत कमी पाच ते दहा हजाराची गुंतवणूक दर महिना आणि 40 ते 50 हजाराच्या आसपास एकत्रित गुंतवणूक असेल तर चांगला पोर्टफोलिओ तयार करता येतो.

advertisement

स्टॉक एसआयपी आणि म्युचुअल फंड एसआयपीमध्ये पैशाचं व्यवस्थापन 

म्युचल फंडमधील ठराविक स्कीममध्ये अनेक लोकांचे पैसे एकत्र येऊन मोठी अमाऊंट तयार होते आणि ती मोठी अमाऊंट फंड मॅनेजर 70 ते 80 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. स्टॉक एसआयपीमध्ये आपल्याकडे रक्कम कमी असल्यामुळे आपण पंधरा ते वीस शेअर्स घेऊ शकतो त्यामुळे म्युचल फंडमध्ये डायव्हर्सिफिकेशन जास्त असते.

advertisement

जोखीम कोणती ? 

म्युचल फंड एसआयपीमध्ये स्टॉक एसआयपी पेक्षा जोखीम कमी असते. कारण फंड मॅनेजर जास्त स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो आणि मार्केटमध्ये पडझड होत असताना घ्यायची काळजी योग्य प्रकारे घेतो, तर स्टॉक एसआयपीमध्ये शेअर्स कमी असल्यामुळे रिस्क ऑटोमॅटिक जास्त असते आणि मार्केट पाडत आसताना गुंतवणूकदाराला कितपत चांगले मॅनेजमेंट करता येते, यावर रिस्क अवलंबून असते.

रिटर्न्स किती ?

स्टॉकमध्ये किंवा स्टॉक एसआयपीमध्ये म्युचल फंड पेक्षा परतावा जास्तच मिळतो, त्याचे कारण म्हणजे स्टॉक एसआयपी ही 15 ते 20 शेअर्सची असल्यान हा पोर्टफोलिओ 70 ते 80 शेअर्सच्या पोर्टफोलिओ पेक्षा सहाजिकच जास्त रिटर्न देतो.

कोणासाठी योग्य?

मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी याविषयी माहिती असेल पाच ते सहा वर्षाचा अनुभव असेल आणि चांगला शेअर कसा निवडावा याच टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिसच ज्ञान असेल तर आपण स्टॉक एसआयपीचा वापर करू शकतो. जर मार्केटमधील ज्ञान कमी आहे दर महिन्याला गुंतवण्याची रक्कम कमी आहे आणि तांत्रिक बाबींची माहिती नसेल तर म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करणे जास्त हितकारक आणि लाभदायक असते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांशी संवाद साधा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/मनी/Share Market/
Stocks आणि Mutual SIP कोणती चांगली? काय आहेत फरक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल