काही मिनिटांत बुडाले 6,00,000,00,00,000 भारतातील कंपन्यांवरही मोठा परिणाम, तुमच्याकडे आहे का Share?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ओरेकलच्या तिमाही निकालांमुळे शेअरमध्ये ११ टक्क्यांची घसरण, ५.९ ते ६.७ लाख कोटींचं नुकसान, AI गुंतवणुकीमुळे कर्ज वाढ, भारतीय IT कंपन्यांवरही दबाव.
अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी असलेल्या ओरेकलने नुकतेच जाहीर केलेले तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार नव्हते. परिणामी, कंपनीच्या शेअरमध्ये एका रात्रीत तब्बल ११% पर्यंतची मोठी घसरण झाली. या एका धक्क्याने ओरेकलचे काही तासांतच सुमारे सुमारे ५.९ ते ६.७ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे.
advertisement
ओरेकलने AI डील्समध्ये मोठी आघाडी घेतली असून, कंपनीचे भविष्यातील कॉन्ट्रॅक्ट्स ४३८% ने वाढून $५२३ अब्ज वर पोहोचले आहेत. ही वाढ चांगली असली तरी, वॉल स्ट्रीट कंपनीच्या महसुलात ज्या वेगाने वाढ होण्याची अपेक्षा करत होते, त्यात ओरेकल कमी पडली. कंपनीचा महसूल $१६.०६ अब्ज राहिला, जो बाजाराच्या $१६.२१ अब्जच्या अपेक्षेपेक्षा कमी होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









