अरिजित सिंगचा गाण्याला 'अलविदा', एका Live Showसाठी घ्यायचा इतके कोटी; 2 तासांचे मानधन ऐकून इंडस्ट्री हादरली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Arijit Singh Retirement: कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अरिजित सिंगने गायकीतून निवृत्ती जाहीर केल्याने संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. एका स्टेज शोसाठी काही कोटी रुपयांचे मानधन घेणारा अरिजित सिंग हा भारतातील सर्वाधिक महागडा गायक मानला जातो.
मुंबई: भारतीय संगीतप्रेमींच्या मनावर अनेक वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणजे अरिजित सिंग होय. प्रेमगीत असो किंवा विरहाची हळवी गाणी, कोट्यवधी लोकांच्या भावना अरिजितच्या गाण्यांतून उमटतात. प्लेलिस्टवर वर्चस्व असणाऱ्या अरिजितने सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे. अरिजितने गायकीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक
भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक म्हणजे अरिजित सिंग होय. गायक राहुल वैद्याने एका मुलाखतीत सांगितलं की अरिजित दोन तासांच्या स्टेज शोसाठी सुमारे 14 कोटी रुपये शुल्क आकारतो. मोठ्या फीशिवायही अरिजित सिंग हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानाचा गायक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची ओळख पक्की झाली असून, एड शीरन, मार्टिन गॅरिक्स यांसारख्या जागतिक कलाकारांसोबत त्याने काम केलं आहे.
advertisement
इतकं यश मिळूनही अरिजितचा स्वभाव अत्यंत साधा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहणं, खासगी आयुष्य जपणं आणि कामावर लक्ष केंद्रित करणं हीच त्याची ओळख आहे.
अरिजित सिंगची एकूण संपत्ती
अहवालांनुसार अरिजित सिंगची एकूण संपत्ती सुमारे 414 कोटी रुपये आहे. नवी मुंबईत 8 कोटींचं आलिशान घर, 3.4 कोटींपेक्षा अधिक किमतीची लक्झरी कार कलेक्शन (Range Rover, Mercedes यांसारख्या ब्रँड्स) त्याच्याकडे आहे.
advertisement
मात्र, तरीही अरिजित आजही पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथेच राहतो. तिथं त्याचं साधं घर आणि छोटंसं स्टुडिओ आहे. कामासाठी प्रवास करणं सोडलं तर तो लो-प्रोफाइल आयुष्य जगतो.
विशेष म्हणजे आपल्या गावात त्याने ‘Heshel’ नावाचं कमी दरात जेवण देणारं रेस्टॉरंटही सुरू केलं आहे. जिथं साधारण 40 रुपयांत जेवण मिळतं, असं सांगितलं जातं.
advertisement
ब्रँड एंडोर्समेंट आणि कॉन्सर्ट्समधून मोठी कमाई
गाण्यांबरोबरच अरिजित सिंग ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई करतो. Coca-Cola, Samsung यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी तो चेहरा राहिला आहे.
लाईव्ह कॉन्सर्ट्स हा त्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. Insider.in नुसार भारतातील अरिजित सिंगच्या कॉन्सर्ट्ससाठी तिकिटांचे दर साधारण 2,000 ते 80,000 रुपयांपर्यंत असतात. मात्र काही शोमध्ये हे दर प्रचंड वाढतात. पुण्यातील एका कॉन्सर्टमध्ये प्रीमियम लाऊंज तिकिट तब्बल 16 लाख रुपयांना विकलं गेल्याचं सांगितलं जातं.
advertisement
डिजिटल प्लॅटफॉर्मवरही वर्चस्व
अरिजित सिंगने डिजिटल विश्वातही नवा विक्रम केला आहे. Spotify वर 140 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्ससह तो जगातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा कलाकार ठरला आहे. या यादीत त्याने Taylor Swift, Ed Sheeran, Ariana Grande यांसारख्या दिग्गज कलाकारांनाही मागे टाकलं आहे.
अरिजित विरुद्ध ए. आर. रहमान, श्रेया घोषाल
भारतामध्ये अरिजितचं मानधन आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. रिपोर्टनुसार ए. आर. रहमान एका तासाच्या शोसाठी सुमारे 1–2 कोटी रुपये घेतात, श्रेया घोषाल एका कॉन्सर्टसाठी 20–25 लाख रुपये कमावते तर सुनिधी चौहान एका गाण्यासाठी साधारण 18–20 लाख रुपये घेते.
advertisement
अरिजित सिंगचा संगीतप्रवास
अरिजित सिंगने 2005 मध्ये Fame Gurukul या रिअॅलिटी शोमधून संगीतप्रवास सुरू केला. 2011 मध्ये Murder 2 मधील Phir Mohabbat या गाण्याने त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मात्र 2013 मध्ये Aashiqui 2 मधील Tum Hi Ho या गाण्याने त्याला देशभरात ओळख मिळवून दिली. यानंतर Channa Mereya, Kesariya, Agar Tum Saath Ho, Ilahi, Raabta, Hawayein, Shayad, Jhoome Jo Pathaan, Zaalima, Tera Yaar Hoon Main, Lutt Putt Gaya यांसारखी असंख्य सुपरहिट गाणी त्याच्या नावावर जमा झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:45 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अरिजित सिंगचा गाण्याला 'अलविदा', एका Live Showसाठी घ्यायचा इतके कोटी; 2 तासांचे मानधन ऐकून इंडस्ट्री हादरली









