ही फसवणूक सर्वप्रथम 18 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यानंतर उद्योज नगर पोलिसांनी तपास सुरू करून 31 मे रोजी साक्षी गुप्ताला अटक केली.
शेअर बाजारात गुंतवणूक, मोबाईल क्रमांकात फेरफार
पोलिस तपासानुसार, गुप्ताने ग्राहकांच्या खात्यांतील पैसे परस्पर शेअर बाजारात गुंतवले परंतु त्या गुंतवणुकीत तिला मोठे नुकसान झाले. त्यानंतर तिने फसवणूक लपवण्यासाठी काही खात्यांचे मोबाइल नंबर बदलून स्वतःच्या नातेवाइकांचे क्रमांक लिंक केले. जेणेकरून मूळ खातेदारांना OTP वा व्यवहार सूचना मिळू नयेत.
advertisement
खाते वापरले 'पूल अकाउंट' म्हणून
उद्योज नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक इब्राहीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ताने एका वृद्ध महिलेचे खाते 'पूल अकाउंट' म्हणून वापरले. फेब्रुवारी 2023 पर्यंत त्या खात्यातून 3 कोटी रुपयांहून अधिक रक्कम फिरवण्यात आली होती.
अन्य गंभीर गैरप्रकार
-40 खात्यांवर ग्राहकांच्या परवानगीशिवाय ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरु केली
-31 ठेवी मुदतीपूर्वी बंद करून 1.34 कोटी रुपये वळवले
-डेबिट कार्ड, पिन व OTP चा गैरवापर करून ऑनलाइन व ATM व्यवहार
-3.4 लाख रुपयांचा बनावट वैयक्तिक कर्ज व्यवहार
-डिजिटल बँकिंग व इन्स्टा कीऑस्कचा वापर
गुप्ताने फसवणुकीतून मिळालेला पैसा अनेक डिमॅट खात्यांत वळवला, जेणेकरून तिचे आर्थिक व्यवहार मागोवा घेणे कठीण जावे.
बँकेची प्रतिक्रिया
आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले, ग्राहकांचे हित हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. फसवणूक लक्षात येताच आम्ही तत्काळ पोलिसांत FIR दाखल केली आणि संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले. आमच्याकडे फसवणुकीबाबत शून्य सहिष्णुतेची धोरण आहे. प्रभावित ग्राहकांच्या सर्व योग्य दाव्यांचे निवारण करण्यात आले आहे.
गुप्ताला न्यायालयात हजर करून एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तपास सुरू आहे.
