सोनम सोनी गेली 15 वर्षे हेअरस्टायलिस्ट म्हणून काम करत आहेत. अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम करण्याचा अनुभव आणि मॉरीशसमध्ये तब्बल अडीच वर्षे केलेली नोकरी या सर्वांच्या जोरावर त्यांनी स्वतःचा सलून सुरू करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी कांदिवलीत पहिला सलून सुरू केला पण सुरुवात होताच लॉकडाऊन लागल्याने त्यांना मोठा फटका बसला. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा सलून बंद पडले आणि नुकसान दुपटीने वाढले.
advertisement
पण या सगळ्यात सोनम डगमगल्या नाहीत. त्यांना त्यांचे पती अमर सोनी यांची मोठी साथ मिळाली. अमर हे याआधी फार्मसी क्षेत्रात नोकरी करत होते. पण सलून व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी स्वतःची नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यवसायात उतरायचा निर्णय घेतला.
दुग्ध व्यवसायातून कुंभेफळच्या शेतकऱ्याची झेप, महिन्याला कमावतो 80 हजार...
यामध्ये एक महत्त्वाचा आधार ठरली त्यांची लहान मुलगी. सोनम आणि अमर यांना एक मुलगी आहे आणि ती वयाने लहान असली तरी खूप समजूतदार आहे. तिच्या प्री-मॅच्युअर समजुतीमुळे आणि घरातील सपोर्टमुळे सोनम आणि अमर यांना व्यवसाय सहज सांभाळता येतो आणि त्याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होतो.
सुरुवातीची 25 लाखांची गुंतवणूक करून सुरू केलेला सलून आज B Bold या नावाने कांदिवलीत चार शाखांपर्यंत पोहोचला आहे. दोघेही पती-पत्नी मिळून हा व्यवसाय उत्तमरीत्या सांभाळतात. सध्या त्यांच्या चारही सलूनमध्ये मिळून जवळपास 40 कर्मचारी काम करतात आणि आज सोनम आणि अमर सोनी आपल्या या मेहनतीतून महिन्याला 15 ते 18 लाख रुपये कमवतात.
लॉकडाऊनच्या संकटातून मार्ग काढत, नव्याने सुरुवात करत आणि परिवाराच्या आधाराने उभ्या केलेल्या या B Bold च्या प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळेल अशी ही यशोगाथा आहे.