दुग्ध व्यवसायातून कुंभेफळच्या शेतकऱ्याची झेप, महिन्याला कमावतो 80 हजार... 

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथील बळीराम दांडगे हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून वडिलोपार्जित गाय पालन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 8 गाई आणि 3 वसले असे एकूण 11 जनावरे आहेत.

+
दुग्ध

दुग्ध व्यवसायातून कुंभेफळच्या बळीराम दांडगे यांची झेप; महिन्याला 80 हजार रुपयांच

छत्रपती संभाजीनगर: तालुक्यातील कुंभेफळ येथील बळीराम दांडगे हे शेतीला जोड व्यवसाय म्हणून वडिलोपार्जित गाय पालन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे 8 गाई आणि 3 वसले असे एकूण 11 जनावरे आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी 90 ते 95 लिटर दूध निघते. व त्या दुधाची विक्री दूध संकलन केंद्रावर केली जाते. या दूध विक्रीच्या माध्यमातून दांडगे यांना 70-80 महिन्याला नफा मिळतो. तसेच गाय पालन करून दुग्ध व्यवसाय कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दांडगे यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
कुंबेफळ येथे बळीराम लांडगे गाय पालन व्यवसाय करत असून त्यांच्याकडच्या 11 जनावरांना सकाळी 6 वाजता चारा खाण्यासाठी गोठ्यात सोडले जाते. मुक्त गोठा पद्धत असल्यामुळे दिवसभर या गाई गोठ्यातच मोकळ्या राहतात. या गाईंच्या माध्यमातून निघणाऱ्या दुधाची घरोघरी विक्री केले जाते तसेच दूध संकलन केंद्रावर देखील दिले जाते. तसेच ते या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई देखील करतात. त्यामुळे त्यांच्याकडे परिसरातील शेतकरी दुग्ध व्यवसायाची माहिती घेण्यासाठी येत असल्याचे देखील दांडगे यांनी सांगितले.
advertisement
गाय पालन व्यवसाय कसा सुरू करावा?
प्रत्येकाची वेगळी पद्धत असते कुणाकडे गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर चांगला सेटअप देखील उभा करता येतो. तसेच कमी म्हटलं तर तीन ते चार गाईंपासून सुरुवात करता येते. व्यवसायातील वाटचाल पाहून पुढे आणखी जनावरांचा समावेश यामध्ये करता येतो. दुग्ध व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी कमी जनावरांपासून सुरुवात करावी, गोठ्याची आणि योग्य खाद्याची व्यवस्था करावी, गायपालन, या व्यवसायामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्यास आणखी जनावरांची वाढ करता येऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दुग्ध व्यवसायातून कुंभेफळच्या शेतकऱ्याची झेप, महिन्याला कमावतो 80 हजार... 
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement