नाशिक :
कोरोना काळानंतर अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे. कमी भांडवलात सहजपणे सुरू करता येणाऱ्या व्यवसायांमध्ये स्कूल बॅग, लेडीज पर्स, आणि ट्रॅव्हलिंग बॅग्स यांचा समावेश होतो. नाशिकमधील पंचवटी भागातील "बॅग वर्ल्ड" हे दुकान अशा इच्छुक उद्योजकांसाठी उत्तम पर्याय ठरले आहे.
व्यवसायाची सुरुवात कशी कराल?
बॅग वर्ल्डमध्ये तुम्हाला अगदी 50 रुपये पासून ते 3000 रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या बॅग्स होलसेल दरात मिळतात. युनिक डिझाईन्स, स्वस्त दर, आणि गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता.
advertisement
वाढत्या मागणीचा विचार:
रोजच्या जीवनात बॅग ही गरज झाली आहे. शाळकरी मुलांसाठी डिझायनर दप्तर, तरुणींसाठी पार्टी वेअर पर्स, पाकीट, तसेच जेंट्ससाठी लेदर वॉलेट यांचा मोठा खप आहे. प्रवासासाठी मोठ्या ट्रॅव्हल बॅग्सही 500 ते 3000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत.
प्रतीक जोबनपुत्र यांचा अनुभव:
दुकान मालक प्रतीक जोबनपुत्र सांगतात की, महाराष्ट्रभर वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था असल्यामुळे व्यवसाय वाढीसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतात. कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करून दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवता येते.
व्यवसायासाठी मार्गदर्शन:
प्रतीक यांच्या मते, नवीन उद्योजकांना कमी भांडवलात उत्तम वस्तू पुरवण्याचा उद्देश ठेवला आहे. होलसेल आणि रिटेल दोन्ही पद्धतीने बॅग्स विक्री केल्या जातात.
उत्तम ठिकाण:
"बॅग वर्ल्ड" दुकान गोरराम मंदिरासमोर, पंचवटी, नाशिक येथे आहे. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.