TRENDING:

बाजारात Ticking Time Bomb, असं कधीच झालं नाही; 15 रुपयांचा शेअर 9 हजार 110 वर, गुंतवणुकदारांसाठी महाभयानक सापळा

Last Updated:

Share Market: 15 वरून थेट 9,110 पर्यंत झेपावलेल्या या शेअरने फक्त 19 महिन्यांत 60,000% परतावा दिला, पण कंपनीची कमाई, विक्री आणि नफा पूर्णपणे शून्य आहे. नावाच्या जादूवर उभ्या या स्टॉकमागे मोठा धोका लपलेला असून गुंतवणूकदारांसाठी तो “टिकिंग टाइम बॉम्ब” ठरू शकतो.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्याने गुंतवणुकीवर धडाकेबाज परतावा दिला. पण ज्याचे मूळ आर्थिक पाया अत्यंत कमकुवत आहेत. होय ही आहे अशा कंपनीची कहाणी जिने मागील 19 महिन्यांत 60,000% पेक्षा जास्त रिटर्न दिला, पण तिचा नफा, विक्री आणि ऑपरेटिंग उत्पन्न सर्व काही "शून्य" आहे. धक्का बसला ना? ही आहे अशा कंपनीची गोष्ट, जिने फक्तनाव बदलूनगुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले. ना कमाई, ना खरा व्यवसाय, तरीही 12,000 कोटींच्या वर मार्केट कॅप आणि परिणामी हा स्टॉक BSE च्या Enhanced Surveillance Measure (ESM Stage-2) च्या कक्षेत गेला आहे. या खेळामागचं संपूर्ण गणित काय आहे जाणून घ्या...

advertisement

60,000% ची अविश्वसनीय झेप

2 एप्रिल 2024 रोजी RRP Semiconductor (तेव्हा GD Trading Agencies Ltd.) चा शेअर 15 वर होता. 17 ऑक्टोबर 2025 ला तो 9,110 वर पोहोचला म्हणजे तब्बल 60,000% रिटर्न. जर एखाद्याने 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 6 कोटींपेक्षा जास्त झाली असती. फक्त जानेवारी 2025 मध्येच या स्टॉकने 4,800% परतावा दिला.

advertisement

पण जेव्हा कंपनीच्या आर्थिक आकडेवारीकडे पाहतो तेव्हा धक्का बसतो, कारण...

Revenue: ₹0

Net Profit: ₹0

Operating Margin: ₹0%

ROE: ₹0%

तरीही तिचे मार्केट कॅप 12,411 कोटींवर पोहोचले आहे.

कंपनी करते तरी काय?

1980 मध्ये स्थापन झालेल्या GD Trading Agencies ने मे 2025 मध्ये आपले नाव बदलून RRP Semiconductor Ltd. केले. नाव बदललं, पण व्यवसाय नाही. कंपनी प्रत्यक्षात कोणतेही सेमीकंडक्टर तयार करत नाही. ती “सेमीकंडक्टर आणि डिजिटल चिप्स” व्यवसायात असल्याचे सांगते आणि इलेक्ट्रॉनिक्स व IT शी संबंधित काही क्रियाकलाप दाखवते. भारत सरकारच्या “सेमीकंडक्टर मिशन” योजनेच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा नावात बदल केला आणि त्याच नावामुळे तिचं नशीब बदललं.

advertisement

फेक हायप आणि अफवा

सोशल मीडियावर बातमी पसरली की क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. कंपनीने स्वतः स्पष्टीकरण दिले- ना सचिनचा यात सहभाग, ना महाराष्ट्र सरकारसोबत कोणतीही 100 एकर जमिनीची डील. तरीही स्टॉकची झेप सुरूच राहिली, म्हणजे हे सर्व वाढ “फेक हायप” आणि लो फ्लोट ट्रेडिंग चा परिणाम आहे.

advertisement

BSE ची कडक नजर – ESM Stage-2

BSE ने हा स्टॉक Enhanced Surveillance Measure (ESM) Stage-2 मध्ये टाकला आहे. याचा अर्थ एक्स्चेंजला यात संभाव्य गडबडीची शंका आहे.

ही कारवाई तेव्हा होते जेव्हा:

-स्टॉक एका दिवसात 20% पेक्षा जास्त वाढतो.

-5 दिवसांत 50% पेक्षा जास्त झेप घेतो.

-ऐतिहासिक मानकांपेक्षा जास्त अस्थिरता दाखवतो.

-RRP Semiconductor ने या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

शेअरहोल्डिंग आणिलो फ्लोटमिस्ट्री

-Promoter Holding: फक्त 1.27%

-Public Holding: 98.72%

शेअरहोल्डर्स: जून 2025 मध्ये 116, सप्टेंबर 2025 मध्ये 562

99% शेअर्स लॉक-इनमध्ये आहेत, म्हणजे बाजारात जवळपास काहीही फ्री फ्लोट नाही. दैनिक व्यवहार 100 शेअर्सपेक्षा कमी, अशा कमी व्हॉल्यूममध्ये एखादी छोटी खरेदीसुद्धा स्टॉकला 20% अपर सर्किट पर्यंत नेऊ शकते. याला सोशल मीडियावर Low Float Manipulation म्हटलं जातं, जिथे काही ट्रेडर्स मिळून किंमती वर नेतात.

RRP Semiconductor चं उदाहरण सांगतं की “नावाची ब्रँडिंग” आणि “स्वप्नांची कथा” कधी बाजारात गुंतवणूकदारांच्या डोक्यावर चढते. पण लक्षात ठेवा बिझनेसशिवाय, विक्रीशिवाय आणि नफ्याशिवाय अशी झेप टिकणं अशक्य आहे.

जसे वॉरेन बफे म्हणतात- Beware the investment activity that produces applause; the great moves are usually greeted by yawns. म्हणजेच- टाळ्या मिळवणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा खऱ्या व्यवसायावर आधारित गुंतवणूक करा, नाहीतर पुढचा धक्का खूपच महागात पडू शकतो.

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही. 

मराठी बातम्या/मनी/
बाजारात Ticking Time Bomb, असं कधीच झालं नाही; 15 रुपयांचा शेअर 9 हजार 110 वर, गुंतवणुकदारांसाठी महाभयानक सापळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल