19 फेब्रुवारी 2025 नंतर निफ्टी 50 जवळपास 3.5% खाली आला असताना, इंडिया VIX 12% घसरला आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. कारण सामान्यतः बाजार घसरला की अस्थिरता वाढते आणि VIX वर जातो. मात्र, यावेळी दोन्ही निर्देशांक एकाच दिशेने खाली आले आहेत, जे बाजारातील परंपरागत समीकरणाच्या अगदी उलट आहे.
VIP ग्रुपचा मेंबर झाला, रात्री व्हायचा क्लास; महिन्यानंतर पायाखालची जमीन सरकली
advertisement
हे अनपेक्षित का आहे?
इंडिया VIX म्हणजे बाजारातील अस्थिरतेचे मापन करणारा निर्देशांक आहे. सहसा बाजार घसरला की गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि अनिश्चितता वाढते. त्यामुळे विक्रीचा दबाव वाढून निफ्टी 50 खाली येतो आणि त्याच वेळी इंडिया VIX वाढतो. मात्र यावेळी हे झालेले नाही.
आता प्रश्न असा निर्माण होतो की इंडिया VIX बाजाराचे खरे चित्र दाखवत आहे का? की बाजाराच्या ट्रेडिंग पद्धती बदलल्या आहेत?
शेअर बाजारात क्रॅश नंतर कॅश! Expert केले मोठे भाकीत, शेअर्सची यादीच दिली
इंडिया VIX आणि निफ्टी 50 यांचे पारंपरिक नाते- इंडिया VIX ला भीतीचा निर्देशांक किंवा ‘व्होलॅटिलिटी इंडेक्स’ असेही म्हणतात.
जेव्हा VIX वाढतो, तेव्हा बाजारात अनिश्चितता आणि भीती वाढल्याचे संकेत मिळतात. गुंतवणूकदार शेअर्स विकू लागतात आणि त्यामुळे निफ्टी खाली जातो. जेव्हा VIX कमी होतो. तेव्हा बाजार स्थिर असतो आणि निफ्टी वाढण्याची शक्यता असते. मात्र यावेळी निफ्टी आणि इंडिया VIX दोन्ही खाली आले आहेत, जे नियमाच्या विरुद्ध आहे.
या बदलामागची कारणे काय?
1. इंडिया VIX पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही. टेक्निकल एक्सपर्ट दिनेश नागपाल यांच्या मते, आता मोठे गुंतवणूकदार (FIIs आणि DIIs) मंथली ऑप्शन्सऐवजी साप्ताहिक ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत आहेत. इंडिया VIX प्रामुख्याने मंथली ऑप्शन्सच्या किमतींवर आधारित असतो. सध्या साप्ताहिक ऑप्शन्सवर भर वाढल्याने मंथली ऑप्शन्समध्ये मोठे चढ-उतार होत नाहीत, त्यामुळे VIX ची अस्थिरता कमी झाली आहे.परिणामी, बाजार पडत असताना VIX वाढायचे गृहितक यावेळी लागू झालेले नाही.
2. बाजाराची घसरण हळूहळू झाली आहे. ट्रेड डेल्टा या फर्मच्या संस्थापक प्रीती छाबडा यांच्या मते, 19 फेब्रुवारी 2025 पासून बाजार हळूहळू खाली आला आहे. सामान्यतः बाजार घसरतो तेव्हा तो अचानक आणि वेगाने पडतो, त्यामुळे गुंतवणूकदार घाबरतात आणि VIX वाढतो. मात्र, यावेळी बाजार धीम्या पद्धतीने घसरल्यामुळे, मोठी भीती निर्माण झाली नाही.परिणामी, VIX वाढण्याऐवजी खाली राहिला.
3. पुट ऑप्शन्सच्या किमती अनियमित झाल्या आहेत. पुट ऑप्शन्स म्हणजे असे स्टॉक मार्केट करार, जे गुंतवणूकदारांना भविष्यात निश्चित किमतीवर शेअर्स विकण्याचा अधिकार देतात. सहसा, बाजार घसरतो तेव्हा पुट ऑप्शन्स महाग होतात आणि VIX वाढतो. मात्र, यावेळी काही पुट ऑप्शन्स स्वस्त मिळत आहेत, तर काहींच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. छाबडा यांच्या मते, या वेळेस ITM (In The Money) पुट ऑप्शन्स खूप कमी प्रीमियमवर ट्रेड करत आहेत, तर काही ठराविक स्ट्राइक प्राइसेसवर प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे बाजारात मोठी अस्थिरता असली तरी VIX योग्य प्रकारे त्या अस्थिरतेला मोजू शकत नाही.
मुंबईच्या प्रॉपर्टी बाजारात खळबळ! अख्ख्या इमारतीची खरेदी
4. निफ्टी 50 आणि इंडिया VIX यांचे नाते स्थिर नसते. फिसडम (Fisdom) चे नीरव करकेरा यांच्या मते, निफ्टी 50 आणि इंडिया VIX यांचा संबंध कायमस्वरूपी स्थिर नसतो. काही वेळा, बाजारात मिश्र प्रतिक्रिया (mixed sentiments) असतात. अशा वेळी VIX आणि निफ्टी 50 परंपरेनुसार वागत नाहीत. करकेरा म्हणतात, बाजारात प्रत्येक वेळी एकसंध मानसिकता नसते. या वेळेस मिश्र भावनांमुळे VIX आणि निफ्टी 50 यांचे पारंपरिक नाते तुटले आहे.
नवीन गुंतवणूक धोरणांची गरज
बाजारातील जुनी समीकरणे बदलत आहेत. ट्रेडिंगसाठी केवळ इंडिया VIX पाहून निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. गुंतवणूकदारांनी या नव्या ट्रेंडला समजून घेऊन नवीन रणनीती स्वीकारली पाहिजे.