TRENDING:

Cash कमवा, या शेअरने मंदीतही करोडपती केले; एका वर्षात 6 रुपयांच्या Stock पाहा कुठे पोहोचला

Last Updated:

Multibagger Stock: शेअर बाजारात मंदी असतानाही काही स्टॉक्स गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा देत आहेत. अवघ्या एका वर्षात तब्बल 2000% पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या शेअरने अनेकांना लखपती-कोट्यधीश बनवले आहे. या मल्टीबॅगर शेअरची गुंतवणूकदारांमध्ये मोठी चर्चा आहे.

advertisement
मुंबई: शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांना मोठे नुकसान सहन करावा लागल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून येत आहेत. बाजारातील ही अस्थिरता पुढील काही महिने अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेअर बाजारात अशा काही कंपन्यात आहेत ज्यांनी दीर्घकाळात मोठा नवा कमवून दिला आहे. बाजारातील काही स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना अल्पावधीतच लखपती आणि कोट्याधीश बनवले आहे. अशाच एका मल्टीबॅगर शेअरने सध्या बाजारात जबरदस्त परतावा दिला आहे. व्यूनाउ इंफ्राटेक (Vuenow Infratech) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या एका वर्षात 2041% पेक्षा जास्त नफा दिला आहे.
News18
News18
advertisement

एका वर्षात गुंतवणूक 21 पट वाढली

IT सेक्टरमधील व्यूनाउ इंफ्राटेकच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. या शेअरची किंमत 4 मार्च 2024 रोजी केवळ 6.04 रुपये होती. मात्र अवघ्या 12 महिन्यांत तो 129.37 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच या शेअरने गुंतवणूकदारांना 2041.88% परतावा दिला आहे.

शेअर बाजारात बॉटम आउट, अजून मोठा क्रॅश; पण Expert दाखवला आशेचा किरण, पुढील...

advertisement

जर एका गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 21 लाख रुपये झाले असते. तसेच 50 हजारांची गुंतवणूक 10 लाखांहून अधिक झाली असती.

मागील काही महिन्यांत जबरदस्त तेजी

फेब्रुवारी महिन्यात देखील या शेअरमध्ये दमदार तेजी दिसली. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा शेअर बीएसईवर 129.37 रुपये या स्तरावर बंद झाला. मागील एका महिन्यातच त्यात 63% वाढ झाली आहे.

advertisement

52 आठवड्यांतील उच्च-नीच पातळी

-52 आठवड्यांत सर्वाधिक किंमत (52-Week High): 196.95 रुपये (28 ऑक्टोबर 2024)

-52 आठवड्यांत सर्वात कमी किंमत (52-Week Low): 6.04 रुपये

शेअर बाजारातील ATM मशीन, आयुष्यभर पैसा छापाल; ११ मार्चआधी खरेदी हा शेअर करा

कंपनीचा मार्केट कॅप आणि भविष्यातील शक्यता

सध्या व्यूनाउ इंफ्राटेकचा मार्केट कॅप 300 कोटी रुपये आहे. या शेअरमध्ये भविष्यात आणखी तेजी राहील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तज्ज्ञांच्या मते, अशा मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

advertisement

गुंतवणूकदारांनी काय करावे?

शेअर बाजारातील अशा अतिशय वेगाने वाढणाऱ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना बाजारातील चढ-उतारांचा विचार करावा. अशा मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, पण जोखीम देखील असते. कोणत्याही शेअरमध्ये पैसे लावण्यापूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील वाढीच्या संधींचा अभ्यास करावा.

शेअर बाजारात विनाशकाळ, पैसा लावणे मोठी चूक; गुंतवणूकदाराने केली भविष्यवाणी

advertisement

व्यूनाउ इंफ्राटेकचा शेअर मागील वर्षभरात 2000% पेक्षा जास्त वाढला आहे आणि अनेक गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. मात्र, यामध्ये गुंतवणूक करताना धोकेही असू शकतात. त्यामुळे नवख्या गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.

मराठी बातम्या/मनी/
Cash कमवा, या शेअरने मंदीतही करोडपती केले; एका वर्षात 6 रुपयांच्या Stock पाहा कुठे पोहोचला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल