मार्चमध्ये सुधारणा होणार?
निवेशकांना आता मार्चमध्ये बाजार सावरू शकेल अशी आशा आहे. कारण गेल्या 10 वर्षांमध्ये 7 वेळा मार्च महिना निफ्टीसाठी सकारात्मक राहिला आहे. 2016, 2017, 2019, 2021, 2022, 2023 आणि 2024 मध्ये निफ्टीने चांगली वाढ नोंदवली होती. तर 2015, 2018 आणि 2020 मध्ये मात्र बाजार कोसळला होता. मात्र तज्ज्ञांच्या मते केवळ हंगामी ट्रेंड (Seasonality) पुरेसा ठरणार नाही. Angel One चे वरिष्ठ विश्लेषक ओशो कृष्णन म्हणाले, निफ्टीची दिशा बदलण्यासाठी केवळ मार्च महिना पुरेसा ठरणार नाही.
advertisement
बाजारातील महाभयंकर 'मॅडनेस'ने लावला १८ लाख कोटींचा चुना; डोळ्यांसमोर उडाला पैसा!
बाजारात घसरणीचे कारण काय?
-कंपन्यांच्या कमकुवत कमाईचे अहवाल
-परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात काढलेले पैसे
-अमेरिकेच्या टॅरिफ संदर्भातील अनिश्चितता
किडनी विका,पण संधी सोडू नका; 'तुघलकी' सल्ला कोणी दिला?
यामुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 85 लाख कोटी (सुमारे 1 ट्रिलियन डॉलर) बुडाले आहेत. सप्टेंबरपासून आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 25 अब्ज (सुमारे 2.07 लाख कोटी) भारतीय शेअर्स विकले आहेत. फक्त फेब्रुवारी महिन्यातच 4.1 अब्ज (सुमारे 34,000 कोटी) गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले.
कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीजचे सीईओ प्रतिक्ष गुप्ता यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड तसेच विमा कंपन्या आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट फंड्स आता शेअर बाजारात नवीन गुंतवणूक करण्यास संकोच करत आहेत.
लहान व मध्यम कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक गडगडले
Nifty Small-Cap 100 मध्ये 13.2% घसरण
Mid-Cap 100 मध्ये 11.3% घसरण
गेल्या वर्षीच्या उच्चांकाच्या तुलनेत स्मॉल-कॅप शेअर्स 26% आणि मिड-कॅप शेअर्स 22% खाली आले आहेत. परिणामी गुंतवणुकदार आता मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आणि डेट-इक्विटी फंडकडे वळत आहेत.
बँकेची Galti Se Mistake; अकाउंटमध्ये चुकून जमा केले 70 लाख कोटी, चूक लक्षात आली
तज्ज्ञांचा अंदाज
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, आदित्य बिर्ला सन लाइफ एसेट मॅनेजमेंटचे CIO महेश पटेल यांच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे भारतीय बाजारावर दबाव कायम राहील. त्यामुळे बाजारात थोडीशीही वाढ झाली तरी गुंतवणूकदार लगेच नफा काढतील, यामुळे मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी घाईगडबड करून निर्णय घेण्याऐवजी मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आणि संतुलित फंड्समध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच जागतिक बाजारातील संकेत आणि धोरणात्मक बदलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.मार्च महिना शेअर बाजारासाठी संजीवनी ठरेल का, हे येणाऱ्या आठवड्यात स्पष्ट होईल.