TRENDING:

Success Story: नोकरीचा राजीनामा दिला, तरुण आता दिवसाला कमवतोय 16 हजार, असं काय केलं?

Last Updated:

अलिकडे कित्येक तरुण हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरताना दिसतात. परंतु बक्कळ पैसे दिसणाऱ्या हॉटेल सारख्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी प्रचंड धाडस आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते.

advertisement
सांगली: अलिकडे कित्येक तरुण हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरताना दिसतात. परंतु बक्कळ पैसे दिसणाऱ्या हॉटेल सारख्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी प्रचंड धाडस आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते. असेच दांडगे धाडस दाखवत पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या ग्रामीण भागातील सुरजने हॉटेल व्यवसाय स्वीकारला आहे. पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकूया. जिद्दी हॉटेल व्यावसायिक सुरज वंजारी यांच्याकडून लोकल18ने जाणून घेतला.
advertisement

सुरज वंजारी हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नेर्ले गावाच्या सामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील धाकटा मुलगा. अल्पभूधारकांची मुले शिकली तरच त्यांना चांगले दिवस पाहायला मिळतील. हे लक्षात घेत सुरज यांच्या आई-वडिलांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत मुले देखील चांगली शिकली. पुढे सुरज यांच्या मोठ्या भावाने पोलीस भरतीतून सरकारी नोकरी मिळवली. त्यावेळच्या ट्रेंडनुसार सुरज यांनी बीएससी केमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच पोलीस दलामध्ये असलेल्या भावाच्या मार्गदर्शनाने सुरज यांनी स्पर्धा परीक्षांची, पोलीस भरतीची तयारी केली. आठ ते नऊ पोलीस भरती दिल्यानंतर शेवटच्या पोलीस भरतीमध्ये सुरज सांगली जिल्ह्यातून एक मार्कने वेटिंग लिस्टमध्ये राहिले.

advertisement

Success Story: गावरान मेंढी पालन ठरलं भारी, वर्षाला 15 लाख निव्वळ कमाई, कशी आहे पद्धत?

महिना नऊ हजारांवर केला जॉब

स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता लक्षात घेऊन सुरज यांनी बीएस्सीच्या शिक्षणावर खाजगी कंपनीत जॉब पाहिला. मिरज परिसरामध्ये त्यांनी नऊ हजार पगारावर दोन महिने जॉब देखील केला. परंतु नोकरीच्या वास्तवाचा अनुभव घेऊन सुरज यांनी व्यवसाय क्षेत्रात करिअरचा विचार केला.

advertisement

कोरोना लॉकडाऊनचा फटका

सन 2018 साठी खाजगी कंपनीतील नोकरी सोडून सुरज यांनी हॉटेल व्यवसाय निवडला. सुरुवातीला मित्रमंडळींनी पुण्यामध्ये हॉटेलसाठी पॉईंट पाहिला. आई-वडिलांनी अत्यंत तडजोडीने हॉटेलसाठी भांडवल उपलब्ध करून दिले होते. उपलब्ध भांडवलावरती सुरुवातीला चार टेबलचे हॉटेल सुरू केले. पुण्यासारख्या ठिकाणी प्रचंड स्पर्धा असलेल्या व्यवसायात सुरुवातीला फारसे कस्टमर मिळाले नाहीत. नव्या व्यवसायाला दोन-तीन महिने होताच कोरोना महामारीने लॉकडाऊन झाले. एक-दोन महिने म्हणता-म्हणता जवळपास दोन वर्ष लॉकडाऊन सदृश्य स्थिती राहिल्याने दोन वर्ष सुरज गावी परतले होते. मात्र भांडवल गुंतून पडल्याने दोन वर्षे वाया गेल्याचे सुरज सांगतात. हॉटेल व्यवसायासारख्या नव्या क्षेत्रात ग्रामीण भागातील सुरजने धाडसाने उडी घेतली होती. अशातच लॉकडाऊनचा फटका बसल्याने तब्बल 12 लाखांचा कर्जाचा डोंगर उभा झाला.

advertisement

डोंगराएवढ्या संकटांना टक्कर देणारे कुटुंब

डोक्यावर बारा लाखांचा कर्जाचा डोंगर होता. हाती फारसे काही शिल्लक नव्हते. होती ती केवळ बाप-लेकांची एकी. घरच्यांना विश्वासात घेऊन कोरोना नंतर पुन्हा एकदा हॉटेल क्षेत्रातच अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द कायम ठेवली. संकटांच्या काळात वडील आणि मोठ्या भावाची भक्कम साथ मिळाल्याचे सुरज सांगतो. एक वेळ आहे तेवढी शेती घाण ठेवू पण आता माघार घ्यायची नाही, असे सुरजच्या वडिलांनी ठरवले होते. आईने घरातील सगळे सोने घाण ठेवून भांडवल दिले. आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या मोठ्या भावाने स्वतःच्या नोकरीवर कर्ज करून सुरजला पाठबळ दिले. प्रत्येकाच्या त्यागाने हॉटेल व्यवसाय हे सुरजसह संपूर्ण वंजारी कुटुंबाचे स्वप्न झाले होते.

advertisement

जिद्दीने तुडवल्या कठीण वाटा

कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा एकदा सुरजने गाव सोडून पुणे गाठले. आपण स्वप्न पाहिलेले हॉटेल उभे करण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल चार पॉईंट बदलले. मार्केट रिसर्च, मेनू ठरवणे, मेनू बनवणे जे-जे शिकणे गरजेचे होते ते प्रत्येक कौशल्य सुरज आत्मसात करत राहिला. स्वतःचे घर, गाव, जिव्हाळ्याची माणसे सगळं सोडून सुरज पुण्यासारख्या शहरात धडपडत राहिला. व्यवसायाची घडी काही केल्या बसत नव्हती.

निमशासकीय नोकरीचा दिला राजीनामा

दरम्यान केव्हा आधी दिलेल्या पोलीस भरतीतील वेटिंग लिस्टचे नाव वर आले. आणि हॉटेल क्षेत्रात धडपडणाऱ्या सुरजची एम.एस.एफ. या निमशासकीय पोलीस दलामध्ये निवड झाली. हाती काहीतरी लागले या विचाराने सुरजने एमएसएफचे ट्रेनिंग केले. मुंबईला जॉइनिंग झाले. निमसरकारी नोकरी दीड महिन्यापासून चालू होती.

परंतु मागील पाच वर्षांच्या धडपडीतून पाहिलेले हॉटेलचे स्वप्न, उभा राहिलेला कर्जाचा डोंगर, कुटुंबाने दिलेली साथ आणि केलेल्या त्यागाची जाणीव असल्याने महिना सोळा हजार पगाराच्या नोकरीत सुरज रमला नाही. मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर जिद्दीला पेटलेल्या सुरजने अवघ्या दीड महिन्यात एम.एस.एफ.चा राजीनामा दिला.

हॉटेल व्यवसायात कमबॅक

सन 2021 मध्ये सुरजने एम.एस.एफ. चा राजीनामा देत कुटुंबाच्या आशीर्वादाने पुन्हा पुण्याची वाट धरली. यावेळी हॉटेलसाठी पॉईंट पहावा किंवा भांडवल उभे करावे अशी आर्थिक स्थिती राहिली नसल्याचे सुरज सांगतो. पुढे गावाकडील अनुभवी मित्रांच्या सल्ल्याने सुरजने पुण्यामध्ये गाडा थाटला. या गाड्यावर सांगली भागातील स्पेशल मेनू असलेला अख्खा मसूर पार्सल सेवा सुरू केली.

गाड्यावर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. एक टेबल पासून सुरू केलेल्या गाडी सोडून काही महिन्यांतच छोटा गाळा भाड्याने घेतला. आणि दोन टेबल, चार टेबल करत त्याच ठिकाणी सहा महिन्यानंतर आठ टेबलचे लोकप्रिय "अद्विका अख्खा मसूर हॉटेल" सुरू केल्याचा खडतर प्रवास सुरजने लोकल 18 सोबत बोलताना सांगितला.

हॉटेल सारख्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते. सुरजने कुटुंब आणि मित्रांच्या साथीने खडतर प्रवास निभावला. दांडगे धाडस दाखवत एमएसएफ मधील नोकरीचा राजीनामा दिला परंतु तितक्याच जिद्दीने पुन्हा कमबॅक करत हॉटेल व्यवसायात कठोर मेहनतीने अस्तित्व निर्माण केले.

निमशासकीय नोकरीत महिना सोळा हजार रुपये पगार घेणारा सुरज आज हॉटेल व्यवसायातून दिवसाला 16000 कमाई करतो आहे. आज पाच-सहा वर्षे मागे जाऊन सुरजने केलेला खडतर प्रवास आठवताना प्रामाणिक कष्ट हेच स्वप्नपूर्तीचे सूत्र असल्याचे समजते. जिद्दी हॉटेल व्यावसायिक सुरजसह नेर्ले गावच्या संपूर्ण वंजारी कुटुंबाचा प्रवास हॉटेल सारख्या क्षेत्रात नव्याने उभे राहणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतो आहे.

मराठी बातम्या/मनी/
Success Story: नोकरीचा राजीनामा दिला, तरुण आता दिवसाला कमवतोय 16 हजार, असं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल