भारताचं पहिलं बजेट अर्थात केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजांच्या काळात म्हणजेच 7 एप्रिल 1860 रोजी सादर केला गेला होता. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला होता. हा अर्थसंकल्प भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुगम चेट्टी यांनी सादर केला होता.
देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर एक वेगळाच विक्रम आहे. त्यांनी सर्वाधिक वेळा म्हणजेच तब्बल 10 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.
advertisement
Old Tax Regime Budget 2025: जुन्या टॅक्स रिजीममधून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
त्यांच्याखालोखाल पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा, प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा, तर निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सात वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. आता एक फेब्रुवारी 2025 रोजी निर्मला सीतारामन जो अर्थसंकल्प सादर करतील, तो त्यांचा आठवा अर्थसंकल्प असेल.
अर्थसंकल्प सादर करताना सर्वांत जास्त वेळ भाषण करण्याचा विक्रम सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. एक फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी बजेट सादर करताना 2 तास 42 मिनिटं भाषण केलं होतं. त्या दिवशी त्यांनी सकाळी 11 वाजता भाषणाला सुरुवात केली होती आणि दुपारी एक वाजून 40 मिनिटांच्या सुमारास त्यांचं भाषण संपलं होतं. त्या वेळी बजेट सादर करताना त्यांच्या तब्येतही बिघडली होती.
यंदाच्या अर्थसंकल्पाकडूनही नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत. या वेळी बजेटमध्ये हेल्थ सेक्टर अर्थात आरोग्य क्षेत्राशी निगडित प्रमुख घोषणा केल्या जाऊ शकतात. आयकराशी संबंधित काही मोठे बदलही केले जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एक नवा टॅक्स स्लॅब तयार केला जाण्याची शक्यता आहे. न्यू टॅक्स रेजीम अधिक आकर्षक बनवण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने बजेटमध्ये काही गोष्टींचा समावेश असू शकेल.