अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धात (ट्रेड वॉर) हा निर्णय आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि कठीण निर्णय मानला जात आहे. फॉक्स बिझनेसच्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, चीनने अद्याप अमेरिकेवर लादलेले कर हटवलेले नाहीत. याच कारणास्तव, अमेरिकेने आता 9 एप्रिलपासून चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर एकूण 104 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
ट्रम्प यांनी आधी दिली होती धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की ते चीनवर 50 टक्के कर लादू शकतात. अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर चीनने ३४ टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादला आहे. त्यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते. ट्रम्प यांनी म्हटले की, जर चीनने 8 एप्रिलपर्यंत आपला 34 टक्के कर रद्द केला नाही तर अमेरिका चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर आणखी 50 टक्के कर लादेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. चीनने ट्रम्पच्या धमकीकडे दुर्लक्ष केले आणि ते अमेरिकेशी जोरदार लढा देईल असे म्हटले. यानंतर व्हाईट हाऊसने चीनवर नवीन शुल्क जाहीर केले.
चीनवर 104 टक्के कर कसा लादला गेला?
अमेरिकेने आता चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर एकूण 104 टक्के कर लादला आहे. हा कर तीन भागात आकारला जातो. सर्वप्रथम, अमेरिकेने या वर्षाच्या सुरुवातीला 20 टक्के कर लादला होता. त्यानंतर 2 एप्रिल रोजी 34 टक्के "परस्पर शुल्क" लादण्यात आले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के नवीन कर जोडला आहे. या तिघांची भर पडल्यास, एकूण कर आता 104 टक्के झाला आहे.
अमेरिकेच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. अनेक देश, विशेषतः चीन, व्यापाराच्या बाबतीत अमेरिकेशी चांगले वागत नाहीत. म्हणूनच तो चीनला त्यांचे व्यापार आणि कर धोरणे बदलण्यास सांगत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. आता ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंध बिघडत चालले आहेत.
