शिक्षण घेत असताना त्यांनी ठरवलं की आपण स्वतःचा व्यवसाय करावा. त्यासाठी त्यांनी 2006 पासून फूड इंडस्ट्रीला भेट देत नेमका पण ग्राहकांना काय वेगळं देऊ शकतो याचा अभ्यास करत अनुभव घेतला. प्रशिक्षण घेऊन 2010 ला शिक्षण पूर्ण करून घरी परतल्यावर त्यांनी विचार केला की बाहेर कुठे न जाता आपण शिर्डी गावातच स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करावी.
advertisement
असा विचार करत त्यांनी 2013 ला सूर्या बेकरीची सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी कामात सातत्य ठेवत व्यवसायात वाढ करत गेले. या फिल्ड मधला त्यांच्याकडे जवळपास पंधरा वर्षाचा अनुभव आहे. तसेच सूर्या बेकरीत त्यांच्याकडे सर्व प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट त्यात बिस्कीट टोस्ट खारी पॅटिस केक तसेच सँडविच आणि बर्गर पण उपलब्ध आहे.
त्याचबरोबर परिवाराची साथ आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांचा हा व्यवसाय यशस्वी आहे. त्यांच्या व्यवसायातून ते जवळपास 20 लोकांना रोजगार देतात. तसेच या व्यवसायातून 30 ते 40 लाखापर्यंतचे कमाई करत आहेत.