ऑक्टोबर महिन्यात जवळ जवळ ७ लाख ५० हजार नवे सदस्य EPFOशी जोडले गेले आहेत. यातील १८ ते २५ वया गटातील सदस्यांची संख्या ५८.४९ टक्के इतकी आहे. या वयोगटातील ५ लाख ४३ हजार सदस्य ईपीएफओशी जोडले गेले आहेत. यातील बहुतेक सदस्यांची पहिलीच नोकरी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला सुनावले, मर्यादेत रहा, पाहा काय झाले
advertisement
ऑक्टोबर महिन्यात २ लाख ९ हजार नव्या महिला सदस्य EPFOशी जोडल्या गेल्या. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ही संख्या २.१२ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे देशातील वर्कफोर्समधील विविधता लक्षात येते. नव्या सदस्यांमधील ६१.२ टक्के हिस्सा हा आघाडीच्या ५ राज्यांतील आहे. या राज्यांतून ८ लाख २२ हजार नवे सदस्य झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे २२.१८ टक्के इतके सदस्य जोडले गेले आहेत.
बोनस शेअर्स नव्हे लॉटरीच; कंपनीचा एक शेअर असेल तर तुम्हाला मिळतील चार!
पेरोल डेटानुसार ऑक्टोबर महिन्यात १२ लाख ९० हजार मेंबर EPFOतून बाहेर पडले आणि त्याच महिन्यात पुन्हा जोडले गेले. या सर्व सदस्यांनी नोकरी बदलली किंवा EPFOमध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये नवी नोकरी स्वीकारली. कर्मचाऱ्यांनी फायनल सेटलमेंटच्या ऐवजी आपल्या जमा रक्कमेमधील काही रक्कम काढून घेण्याचा पर्याय स्विकारला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अशा सदस्यांची संख्या १६.२३ टक्क्यांनी वाढली आहे. पेरोलच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यातील नव्या महिला सदस्यांची संख्या २.०९ लाख इतकी आहे.
