शेअर बाजारातील दुर्मिळ संधी; कंपनी एका शेअरवर देत आहे ४ बोनस शेअर, रेकॉर्ड डेट जाणून घ्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
मुंबई: बोनस शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. गारवेयर टेक्निकल फायबर्स लिमिटेड (Garware Technical Fibres Ltd) ने पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी एक शेअरवर चार बोनस शेअर्स देईल. कंपनीच्या बोर्डाने ७,९४,१२,६७६ बोनस इक्विटी शेअर्स देण्यास करण्यास मंजुरी दिली आहे. बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट 3 जानेवारी 2025 ठरवण्यात आली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत जर तुम्ही कंपनीचे शेअर विकत घेतले तरच बोनस शेअर मिळतील. मुंबई शेअर बाजारात बुधवारी कंपनीचे शेअर्स ४ हजार २५९.१५ रुपयावर बंद झाले.
८ हजार ४५५ कोटी रुपये मार्केट कॅप
गारवेयर टेक्निकल फायबर्स लिमिटेडचे ५२ आठवड्यांचे उच्चांक बीएसईवर ४ हजार ९२५.८० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ३ हजार ११६.१० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८ हजार ४५५ कोटी रुपये आहे.
गारवेयर टेक्निकल फायबर्स शेअर प्राइस हिस्ट्री
गारवेयर टेक्निकल फायबर्सच्या शेअर्सच्या कामगिरीकडे पाहिल्यास गेल्या एका आठवड्यात 10.53% घट झाली आहे. गेल्या एका महिन्यात ७.४०% घसरण झाली आहे. मागील ३ महिन्यांत ४.०७% वाढ झाली आहे. या वर्षी २६.७०% वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील एका वर्षात २६.५१% वाढ झाली आहे. गेल्या ३ वर्षांत या शेअर्सने ३२.०६% परतावा दिला आहे.
advertisement
बोनस शेअर्स म्हणजे काय?
view commentsबोनस इश्यू म्हणजे ज्यामध्ये कंपनी आपल्या विद्यमान शेअरधारकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता अतिरिक्त शेअर्स देते. हे शेअर्स साधारणतः शेअरधारकांकडे आधीपासून असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात दिले जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2024 9:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजारातील दुर्मिळ संधी; कंपनी एका शेअरवर देत आहे ४ बोनस शेअर, रेकॉर्ड डेट जाणून घ्या


