भदंत विमांसा, हे बौद्ध भिक्षू असून ते मराठी विषयातून पीएचडी करीत आहेत. त्यांनी पाली भाषेला स्वतंत्र आणि एडेड विभाग मिळावा या मागणीसाठी शांततेचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 23 दिवसांपासून ते विद्यापीठ परिसरात ठामपणे या मागणीसाठी बसले आहेत.
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आरपारची लढाई लढण्याच्या तयारीत, केली महत्वाची मागणी
advertisement
त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की पाली भाषेला स्वतंत्र एडेड विभाग स्थापन करून न्याय द्यावा. “विद्यापीठाने नवीन विभागांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली, मात्र पाली विभागावर अन्याय होत आहे. VC सरांनी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत,” असे विमांसा यांचे म्हणणे आहे.
भदंत विमांसा यांनी आंदोलनादरम्यान हेही अधोरेखित केले की पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही. CEBS Encroachment जमिनीवरून विद्यापीठाने हस्तक्षेप करून ती जागा मुक्त केल्यास, तिथे किमान ३०० विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा मिळू शकते. मात्र, विद्यापीठ प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
6000रूपये मिळाले तरीही काढता येईना, कंपनीने कल्याण-डोंबिवलीकरांना कसा घातला गंडा
“मी एकटा आंदोलन करत आहे, पण माझ्या अंगावरचे चिवर हे फक्त वस्त्र नाही तर माझ्या समाजाचा आधार आहे. त्यामुळे या लढ्यात मी एकटा नाही,” असे सांगून त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या समाजाच्या पाठिंब्याचा उल्लेख केला.
या आंदोलनातून ते पाली विभागाच्या अस्तित्वासाठी, सांस्कृतिक दडपशाहीविरुद्ध आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी लढा देत आहेत. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या ध्येयाने हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.