या कॅफेची संकल्पना अगदी वेगळी आहे. इथे येणाऱ्यांनी केवळ खाण्यापिण्यासाठी बसायचं नाही तर पुस्तकांसोबत वेळ घालवायचा. शांतपणे वाचायला मिळावं आणि तरीही खर्च खिशाला परवडेल असाच असावा. त्यामुळेच येथील मेन्यू फक्त 59 रुपयांपासून सुरू होतो हे या कॅफेचं मोठं आकर्षण आहे.
advertisement
मेन्यूमध्ये तरुणाईला भुरळ घालणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्यात विविध प्रकारचे मॅगी, वेज–नॉनवेज पिझ्झा, विविध प्रकारचे बर्गर, टाकोज, मोमोस, गार्लिक ब्रेड, फ्रेंच फ्राईज यांचा समावेश आहे. फक्त खाण्यापुरतं नव्हे तर पेयांच्या मेन्यूतही मोठी विविधता पाहायला मिळते. आकर्षक कोल्ड कॉफी, ओरिओ मिल्कशेक, चॉकलेट फ्रीझ, फ्रूट मिल्कशेक्स, मॉकटेल्स असे एकापेक्षा एक पर्याय इथे विद्यार्थ्यांना आणि पुस्तकप्रेमींना मिळतात. या सर्व पदार्थांची खासियत म्हणजे सगळं फ्रेश बनवलं जातं. त्यामुळे चव, गुणवत्ता आणि किफायतशीर दर या तिन्हींचं सुंदर मिश्रण कॅफेमध्ये मिळतं.
कॅफेची रचना देखील तरुणाच्या कल्पकतेची साक्ष देते. भिंतींवर पुस्तकांच्या रॅक्स, उबदार पिवळ्या प्रकाशात वाचनासाठी दिलेले कोपरे, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण कॉलेज विद्यार्थ्यांसाठी तसेच पुस्तक वाचन आवडणाऱ्यांसाठी एक परफेक्ट हँगआऊट स्पॉट बनले आहे.





