Mumbai Market : लग्नासाठी फक्त 15 रुपयांपासून इथेनिक बांगड्या, व्यवसायाठी खरेदीची संधी, मुंबई इथं आहे मार्केट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
साडी, लेहेंगा किंवा ट्रेंडी कुर्ती कोणताही पोशाख असो, त्याला उठावदार लुक देण्यासाठी बांगड्या हा महिलांचा आवडता दागिना आहे.
मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. साडी, लेहेंगा किंवा ट्रेंडी कुर्ती कोणताही पोशाख असो, त्याला उठावदार लुक देण्यासाठी बांगड्या हा महिलांचा आवडता दागिना आहे. अशा वेळी जर तुम्हालाही कमी भांडवलात इथेनिक ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मुंबईतील मालाड येथील क्रिस्टल प्लाझा मार्केट हे योग्य ठिकाण आहे.
येथील दुकानदारांकडे विविध प्रकारच्या आकर्षक बांगड्या फक्त 15 रुपयांपासून उपलब्ध आहेत. काही मेटलच्या बांगड्यांचे सेट 30 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत मिळतात. अनेक ठिकाणी डझनभर (12 पीस) किंवा 10 पीस पॅकेट्समध्ये बांगड्या घाऊक दरात दिल्या जातात.
बांगड्यांचे प्रकार आणि त्यांचे दर
advertisement
काचेच्या बांगड्या – रंगीबेरंगी आणि पारंपरिक लुक असलेल्या या बांगड्या 15 ते 25 रुपयांपासून सुरू होतात. 12 बांगड्यांच्या सेटमध्ये वेगवेगळे रंग मिळतात.
1) मेटल बांगड्या – गोल्ड, सिल्व्हर आणि ऑक्सिडाईज्ड फिनिशमध्ये. यांची किंमत 30 ते 50 रुपये सेटप्रमाणे असून एका पॅकमध्ये 10 किंवा 12 पीस असतात.
2) स्टोन वर्क बांगड्या – कृत्रिम दगड, झिरकॉन्स आणि चमकदार वर्क असलेल्या या बांगड्या 40 ते 60 रुपये दराने मिळतात.
advertisement
3) लाख बांगड्या – राजस्थान आणि गुजरात डिझाईन्ससह या आकर्षक बांगड्या 50 ते 70 रुपये प्रति सेट मिळतात.
4) मिरर वर्क आणि बीड वर्क बांगड्या – पारंपरिक तसेच फ्युजन ड्रेसला साजेशा या बांगड्या 35 ते 55 रुपये दराने उपलब्ध आहेत.
घाऊक विक्रेत्यांकडून खास ऑफर
view commentsक्रिस्टल प्लाझामधील अनेक दुकानदार घाऊक दरात बांगड्या विकतात, त्यामुळे व्यवसायासाठी खरेदी करणाऱ्यांना मोठी सूट मिळते. काही ठिकाणी 500 रुपयांमध्ये 10 सेट अशा ऑफरदेखील दिल्या जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Market : लग्नासाठी फक्त 15 रुपयांपासून इथेनिक बांगड्या, व्यवसायाठी खरेदीची संधी, मुंबई इथं आहे मार्केट

