TRENDING:

मुंबईकरांनो लक्ष द्या! तुम्ही निवडलेले नगरसेवक आहेत बाहुबली, झोप उडवणारा अहवाल समोर

Last Updated:

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा सविस्तर अभ्यास करण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पार्श्वभूमीचा धक्कादायक अहवाल समोर आला असून, सुमारे 25 टक्के विजयी नगरसेवकांवर गुन्हेगारी प्रकरणांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा सविस्तर अभ्यास करण्यात आला.
News18
News18
advertisement

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 227 विजयी नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यापैकी 54 नगरसेवकांनी (सुमारे 24 टक्के) आपल्यावर गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये 29 नगरसेवकांवर (13 टक्के) गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी आरोप असल्याची नोंद आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, फसवणूक, दरोडा आणि महिलांविरोधातील गुन्हे अशा स्वरूपाच्या प्रकरणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

advertisement

स्वराज्य संस्थांतील कारभाराच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह

या अहवालामुळे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या गुन्हेगारीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची पार्श्वभूमी स्वच्छ असावी, अशी अपेक्षा असतानाच विजयी ठरलेल्या सुमारे चारपैकी एका उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणे चिंताजनक मानले जात आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील कारभाराच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

advertisement

पाचपैकी चार विजयी उमेदवार कोट्याधीश

दरम्यान, आर्थिक बाबींचा विचार केला असता, जवळपास पाचपैकी चार विजयी उमेदवार कोट्याधीश असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बहुतांश उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रांत कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. वाढती आर्थिक असमानता आणि निवडणूक खर्चाचा वाढता बोजा यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी निवडणूक लढवणे अधिक कठीण होत असल्याची बाब यातून समोर येते.

advertisement

उमेदवारांची निवड करताना अधिक काटेकोर निकष लावावेत

एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी मतदारांनी उमेदवारांच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊन जाणीवपूर्वक मतदान करावे, तसेच राजकीय पक्षांनी उमेदवारांची निवड करताना अधिक काटेकोर निकष लावावेत, अशी शिफारस केली आहे.  उमेदवारांची स्वच्छ प्रतिमा आणि आर्थिक पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कॉलेज सांभाळत व्यवसायाची वाट, सलोनीचा चीजकेक स्टॉल हिट, महिन्याची कमाई तर पाहाच
सर्व पहा

ठाकरेंच्या शिवसेनेत मानापमानाचा धुरळा! विरोधी पक्षनेतेपद मिळताच किशोरी पेडणेकरांनी मैत्रिणींचा पत्ता केला कट; नेमकं घडलं काय?

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांनो लक्ष द्या! तुम्ही निवडलेले नगरसेवक आहेत बाहुबली, झोप उडवणारा अहवाल समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल