माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी अनेक वाद होते मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी मॉरिस भाईच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह आले होते. या लाईव्हमध्ये मॉरीस भाईनं अभिषेक घोसाळकर यांचं स्वागत केलं आणि सर्व मतभेद विसरून आपण दोघं एकत्र आल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर दोघेजण त्यांच्या परिसरासाठी कोणत्या गोष्टी करणार आहोत? याविषयी त्यांनी माहिती दिली.
advertisement
Abhishek Ghosalkar : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू
फेसबुक लाइव्हदरम्यान दोघांमध्ये काय बोलणं झालं?
मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी बोलताना म्हटलं की, "एक चांगलं व्हिजन घेऊन आम्ही सोबत आलो आहोत. नवीन वर्षात लोकांचा फायदा कशात आहे हे लक्षात घेऊन आम्ही काम करू. आम्ही आज 300 लोकांना साडी आणि रेशन वाटण्याच कार्य केलं. तसंच 10 तारखेला मुंबई ते नाशिक, आणि नाशिक ते मुंबई ट्रिपसाठी बसेस पाठवणार आहोत. गणपत पाटील नगर, बोरिवली, आयसी कॉलनी, इत्यादी प्रभागातील लोकांची चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करू" असं त्यानं सांगितलं.
फेसबुक लाईव्हच्या शेवटी घोसाळकर म्हणाले की, " आमच्यामध्ये अनेक मतभेद होते परंतु हे मतभेद दूर करून आम्ही आता एकत्र आलोय आणि लोकांसाठी नक्कीच चांगलं काम करू. अजून पुढे एकमेकांसोबत खूप चांगली काम करायची आहेत ही तर फक्त सुरुवात आहे. आपण बाहेर जाऊ आणि कामाला सुरुवात करू. "
असं सांगून मॉरिसने घोसाळकर यांना फेसबुक लाईव्हमध्ये बोलायचं सांगितलं त्यानंतर पिस्तुल आणली आणि गोळीबार केला. एकूण 5 गोळ्या घोसाळकरांवर झाडल्या. त्यानंतर मॉरिसने स्वत: वरही गोळी झाडून आत्महत्या केली.
