TRENDING:

गौराई येते माहेरी, अलिबागमधील 50 वर्षांची परंपरा नेमकी काय, VIDEO

Last Updated:

अलिबागमधील मोठे शाहपुर या गावात भारती पाटील यांच्या घरात मागील 50 वर्ष गौराइचे आगमन होते आहे. यावेळेस त्या त्यांच्या गौराईचा साजशृंगार करतात. तिला सजवतात. तिला आगरी कोळी परंपरेनुसार लूक करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

अलिबाग : गौरी गणपतीत कोकणात ओवश्याला खूप महत्त्व आहे. गणपतीत चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गौराईचे आगमन होते. अलिबागमध्येही गेले 50 वर्ष एका घरात गौराईचे आगमन होत आहे. अलिबागमध्ये अनेक घरांमध्ये गौराई येते. तिला दागिन्यांनी सजवले जाते तिचा साजशृंगार केला जातो.

अलिबागमधील मोठे शाहपुर या गावात भारती पाटील यांच्या घरात मागील 50 वर्ष गौराइचे आगमन होते आहे. यावेळेस त्या त्यांच्या गौराईचा साजशृंगार करतात. तिला सजवतात. तिला आगरी कोळी परंपरेनुसार लूक करतात.

advertisement

शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती : साताऱ्यातील ही अनोखी परंपरा नेमकी काय?, VIDEO

याची परंपरा किंवा यामागची कथा काय असे विचारल्यावर त्या सांगतात की, गौराई जेव्हा माहेरहुन सासरी जाते तेव्हा तिची सासू तिला विचारते, तू माहेरी काय जेवलीस, तेव्हा गौराई म्हणते मी पोळी, साजुक तूप असं अन्न जेवली. त्यावर विश्वास न ठेवता गौराईचा छळ करणारी तिची सासू तुझे माहेर गरीब म्हणून तिला खूप त्रास देते आणि तेव्हापासूनच गौराई माहेरी आली की माहेरवाशीण म्हणून घरातील लोकं तिची मनोभावे पूजा करुन तिला साग्रसंगीत स्वयंपाक देऊन दागदागिन्यांनी मढवतात. गौराइचे खूप लाड करतात, अशी यामागची आख्यायिका आहे.

advertisement

सेलिब्रेटींच्या घरी अवतरल्या ‘बया’, संगीतकार प्रशांत नाक्तीच्या घरचा सुंदर असा देखावा पाहिला का, VIDEO

कोकणात या गौराईचे पूजन करताना तेरडे, नागवेल अशा पाच वनस्पतींची पूजा करुन या वनस्पतींना साडी नेसून तिचा साजशृंगार केला जातो. 'मी गेले 50 वर्ष घरात गौराई बसवत आहे. आमच्या अलिबागमध्ये कोकणात या सगळया सणांना खूप महत्त्व आहे. त्यात ओवसा म्हणजे स्त्रियांचा आपुलकीचा सण', या शब्दात मोठे शहापुर गावातील भारती पाटील यांनी आपल्या भावना लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
गौराई येते माहेरी, अलिबागमधील 50 वर्षांची परंपरा नेमकी काय, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल