शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीचं नाव मोरीस नरोना म्हणून आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेली माहिती मोरिस नरोना यांनी स्वतःला गोळी मारून घेतली.
abhishek ghosalkar : फेसबुक LIVE सुरू असताना अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार, संपूर्ण VIDEO
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.
advertisement
अभिषेक घोसाळकर हे कायम चर्चेत राहिले होते. विनोद घोसाळकर यांची सून आणि त्यांचा मुलगा हे नगरसेवक राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते रिक्युअर बोर्डाचे ते सदस्य होते. राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.