लोकलमध्येच राहावं लागलं
मिळालेल्या माहितीनुसार,एसी लोकल तब्बल 5 ते 10 मिनिटे दादर स्थानकात उभी होती. प्रवासी दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते, पण काहीही झाले नाही. मात्र काही वेळाने एसी लोकलचे दरवाजे न उघडताच एसी लोकल थेट पुढे गेली झाली. दादरला उतरणाऱ्या प्रवाशांसाठी हा धक्काच होता. काही प्रवासी घाबरून गेले तर काहींनी संताप व्यक्त केला.
advertisement
">http://
भायखळा स्थानकात पोहोचल्यानंतरच अखेर एसी लोकलचे दरवाजे उघडले. त्यानंतर दादरला उतरणारे प्रवासी भायखळ्यात उतरले. दादर स्थानकात उतरायचे असलेल्या प्रवाशांना तब्बल 6.4 किलोमीटर पुढे येऊन पुन्हा डाउन दिशेने प्रवास करावा लागला. या प्रकारामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढला.
घटनेचे नेमके कारण काय?
प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भायखळा स्थानकात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मोटरमनच्या केबिनमध्ये सात प्रवासी होते. मात्र गार्ड हा ट्रेनचा प्रभारी असल्याने मोटरमनकडे दरवाजे उघडण्याची थेट यंत्रणा नव्हती. तसेच कोचमधील टॉक-बॅक मेकॅनिझम बॉक्स कार्यरत नव्हता किंवा उपलब्ध नव्हता अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने एसी लोकलमधील प्रवासी सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
