TRENDING:

Akash kumar Home : अभिनय आणि फिटनेसचा बादशाह! बॉलिवूडच्या 'मेगास्टार'चे मुंबईतील हे घर पाहिलं का?

Last Updated:

Akash kumar Home Mumbai : अभिनय आणि फिटनेसचा बादशाह अक्षय कुमारचं मुंबईतील आलिशान घर पाहिलंत का? समुद्रकिनारी वसलेलं हे सुंदर निवासस्थान त्याच्या साधेपणाचं आणि ऐश्वर्याचं अनोखं मिश्रण आहे. चाहत्यांसाठी हे घर आकर्षणाचं ठिकाण ठरतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई  : बॉलिवूडच स्वप्ननगरी मुंबई म्हणजे भारतीय सिनेमाचं हृदय! इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच विचार असतो की, कधी तरी एखाद्या सुपरस्टारला भेटावं आणि जर तुम्ही अक्षय कुमारचे चाहते असाल, तर त्यांचं घर पाहण्याचा मोह आवरणं अशक्यच आहे. कारण ‘खिलाडी’ अक्षय कुमार हा केवळ एक यशस्वी अभिनेता नाही तर तो शिस्त, फिटनेस आणि साधेपणाचं उत्तम प्रतीक मानला जातो.
akshay kumar home
akshay kumar home
advertisement

अक्षय कुमारचं घर – ‘प्राइम लोकेशन’मधला स्वर्ग

अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना मुंबईच्या जुहू भागात एका आलिशान समुद्रकिनारी बंगल्यात राहतात. हा बंगला मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनवर आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेलं हे घर म्हणजे निसर्ग आणि शांतीचं सुंदर मिश्रण नक्कीच म्हणता येईल. सकाळी समुद्रावर उगवणारा सूर्य, संध्याकाळी थंड वाऱ्याची झुळूक आणि त्याच ठिकाणी उभारलेल हे घर. अर्थातच पाहणाऱ्याला एकदम सिनेमातील दृश्य वाटतं.

advertisement

ट्विंकल खन्नाने स्वतः इंटेरिअर डिझाइनमध्ये रस घेतल्यामुळे हे घर एकदम आधुनिक आणि तरीही सौंदर्यपूर्ण आहे. घरातील प्रत्येक कोपरा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब दाखवतो, साधेपणा, शिस्त आणि आकर्षकता.

घराचा बाह्य देखावा आणि परिसर

अक्षय कुमारच्या घरासमोरून चालताना तुम्हाला एक शांत आणि हिरवाईने भरलेला परिसर दिसेल. आसपास खूप गर्दी नसते, पण चाहत्यांनी आणि पर्यटकांनी नेहमीच या ठिकाणाला भेट दिलेली असते. अनेकदा लोक फक्त घराबाहेर उभे राहून फोटो काढतात, काही वेळा समुद्रकिनारी बसून त्यांच्या बंगल्याकडे नजर लावून राहतात.

advertisement

घराचं मुख्य गेट अत्यंत आकर्षक आणि तरीही साधं आहे. कुठेही झगमगाट नाही, पण एका स्टारच्या निवासस्थानाची ओळख नजरेआड होत नाही. बाहेरूनच घराची नीटनेटकी झाडं, सजावट आणि शिस्तबद्ध वातावरण दिसतं. अक्षयच्या व्यक्तिमत्त्वाशी ते पूर्ण जुळतं.

घरातील वैशिष्ट्यं – लक्झरी आणि संस्कारांचं सुंदर संतुलन

अक्षय कुमारच्या घरात आलिशानपणा नक्कीच आहे, पण तो दिखाऊ नाही. ट्विंकल खन्नाने सजवलेलं हे घर क्लासिक आणि आर्टिस्टिक आहे. घरातील लिव्हिंग रूममध्ये मोठ्या खिडक्या आहेत ज्या थेट समुद्राकडे उघडतात. सूर्यास्ताचा नजारा पाहत चहा पिणं म्हणजे स्वप्नवत अनुभव.

advertisement

अक्षय कुमारला फिटनेसची अतिशय आवड असल्याने त्यांच्या घरात अत्याधुनिक होम जिम आहे. ते दररोज सकाळी 4.30 वाजता उठतात आणि योग, कार्डिओ, आणि मार्शल आर्ट्सचा सराव करतात. त्यामुळे घरातील एक भाग पूर्णपणे फिटनेससाठी समर्पित आहे.

समुद्रकिनारी असलेलं खास ठिकाण

अक्षय कुमारचं हे घर समुद्रकिनाऱ्याच्या अगदी कडेला आहे. त्यामुळे तेथे बसून समुद्राचं सौंदर्य पाहणं ही एक विलक्षण अनुभूती आहे. ट्विंकल आणि अक्षय अनेकदा घराच्या टेरेसवर सकाळी ध्यान किंवा योग करतात. काही वेळा ट्विंकल तिच्या पुस्तकांसाठी किंवा लेखनासाठी इथल्या शांत वातावरणाचा उपयोग करते.https://www.instagram.com/p/DOSrdL-AHwD/?hl=en&img_index=6

advertisement

घराच्या मागे एक छोटं प्रायव्हेट गार्डन आहे, जिथे फुलं आणि औषधी वनस्पतींची लागवड केली गेली आहे. अक्षयला निसर्गात वेळ घालवायला खूप आवडतं, त्यामुळे इथं त्यांच्यासाठी एक छोटं स्पिरिच्युअल कॉर्नर देखील आहे.

अक्षय कुमारच्या घराला भेट देताना काय लक्षात घ्यावं?

जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल आणि जुहूमध्ये फिरताना अक्षय कुमारचं घर पाहायला गेला, तर काही गोष्टी लक्षात ठेवा:

1)गेटसमोर गर्दी करू नका. हे एक खासगी निवासस्थान आहे, त्यामुळे फक्त बाहेरून पाहणं योग्य ठरेल.

2फोटो घेऊ शकता, पण आदर ठेवा.

3)शेजारील रहिवाशांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

4)संध्याकाळी किंवा सकाळी जाणं उत्तम,कारण त्या वेळी समुद्रकिनारा सुंदर दिसतो आणि परिसर शांत असतो.

अक्षय कुमारचं घर पाहताना त्यांच्या जीवनशैलीची झलक दिसते. कठोर परिश्रम, शिस्त आणि विनम्रता. ते कधीही पार्टी सर्किटमध्ये फारसे दिसत नाहीत. त्यांच्या घरात रात्री उशिरापर्यंत बॅश चालत नाही; उलट ते लवकर झोपणं आणि लवकर उठणं पसंत करतात. मुंबईतील अनेक सेलिब्रिटींच्या घरांच्या तुलनेत अक्षयचं घर ‘हाय प्रोफाईल’ असूनही ‘डाउन टू अर्थ’ वाटतं.

चाहत्यांसाठी आकर्षणाचं ठिकाण

मुंबईत येणारे देश-विदेशातील पर्यटक खासकरून ‘बॉलिवूड स्टार्स होम टूर’ करतात. त्यात शाहरुख खानचं ‘मन्नत’, सलमानचं ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’, आणि अर्थातच अक्षय कुमारचं ‘प्राइम बीच बंगला’ यांचा समावेश असतो.

अनेक यूट्यूब व्लॉगर आणि फोटोग्राफर या घराच्या बाहेरील दृश्यांचं कव्हरेज करतात. समुद्राच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं हे घर ‘सिंपल पण क्लासी’ अशा शब्दांत वर्णन केलं जातं.

1) वेस्टर्न रेल्वे (Western Line)

जर तुम्ही मुंबईच्या वेस्टर्न लाईनवर असाल तर हा अक्षयच्या घरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला थेट अंधेरी स्टेशनवर उतरणे आवश्यक आहे. येथे उतरल्यावर तुम्ही बस, रिक्षा किंवा कॅबने सहज जाऊ शकता. मात्र तुम्हाला येथे आल्यानंतर जूहू तारा या रोडपर्यंत जावे लागेल

2) सेंट्रल रेल्वे (Central Line)

जर तुम्ही सेंट्रल लाईनवर राहत असाल, जसे ठाणे, कल्याण, डोंबिवली किंवा सीएसटी परिसरात, तर सर्वप्रथम तुम्हाला दादर स्टेशनपर्यंत यावे लागेल. दादर हे सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनला जोडणारे मुख्य स्टेशन आहे.

3) हार्बर लाईन (Harbour Line)

जर तुम्ही हार्बर लाईनवर राहत असाल जसे की वाशी, नेरुळ किंवा पनवेल परिसर तर सुरुवातीस तुम्हाला कुर्ला स्टेशनपर्यंत पोहोचावे लागेल. कुर्लावर उतरल्यावर वेस्टर्न लाईनवर थेट जाणारी ट्रेन पकडून अंधेरी स्टेशनवर पोहचता येईल.

अंधेरी स्टेशनवरून अक्षयाच्या घरापर्यंत कसे जावे?

अंधेरी स्टेशनवर उतरल्यावर पुढचा प्रवास अतिशय सोपा आहे. खालील पर्याय तुम्ही वापरू शकता.

1)रिक्षा किंवा टॅक्सी

अंधेरी स्टेशनच्या पश्चिम बाहेर पडल्यावर तुम्हाला सहजपणे रिक्षा किंवा टॅक्सी मिळेल.

2)बस सेवा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

अंधेरी स्थानकातून जुहू बिचकडे जाणारी BEST बसही पकडावी लागेल. बस स्टेशनच्या बाहेरून मिळते. बस प्रवासादरम्यान तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळेल.

मराठी बातम्या/मुंबई/
Akash kumar Home : अभिनय आणि फिटनेसचा बादशाह! बॉलिवूडच्या 'मेगास्टार'चे मुंबईतील हे घर पाहिलं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल