त्याचं झालं असं, की शुक्रवारी नवी मुंबईत मनसेच्यावतीने ब्रास बँड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट दिली. ते आल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली. यावेळी एक श्वान गर्दीत अडकला. त्यामुळे प्रयत्न करुनही त्याला बाहेर निघता येईना. याचवेळी अमित ठाकरे यांची नजर गोंधळलेल्या या श्वानावर पडली.
advertisement
अमित ठाकरे यांनी या श्वानाला मदत करण्यासाठी लगेचच व्यासपीठावरून उडी घेतली. ते श्वानाच्या जवळ गेले, बाटलीने त्याला पाणी पाजलं. यावेळी त्यांच्या आसपास अनेक लोक उभा होते, जे त्यांचा व्हिडिओ बनवत होते. अमित ठाकरे यांनी श्वानाला पाणी पाजल्यानंतर त्याच्या पाठीवरून हात फिरवण्यास सुरूवात केली. अमित ठाकरे यांचं हे श्वानप्रेम उपस्थित सर्वांचं मन जिंकणारं होतं.
Political News : शिखर बँकेचं भूत पुन्हा अजितदादांच्या मागे लागणार? राज्यातील महत्त्वाच्या 5 घडामोडी
अमित ठाकरे यांनी नंतर या श्वानाची गर्दीतून सुटका केली. यावेळी त्यांची ही कृती अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. आहे. ज्याच्या व्हिडिओ आता समोर आला असून अमित ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.