Political News : शिखर बँकेचं भूत पुन्हा अजितदादांच्या मागे लागणार? राज्यातील महत्त्वाच्या 5 घडामोडी

Last Updated:

Political News : आज शनिवार असला तरी अनेक राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे.

News18
News18
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक, शेतमालाला भाव, आरक्षणाचा तिढा ते राजकीय आरोप प्रत्यारोपाने राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने धनगर समाजाची आरक्षणाची मागणी फेटाळून लावली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची अटीतटीची लढाई सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर आज दिवसभरातील महत्त्वाच्या पाच घडामोडी पाहुयात.
अजित पवार अडचणीत येणार?
राज्यातील शिखर बँकेचा 25000 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच माणिकराव पाटील आणि इतर 74 यांच्या वतीने दाखल प्रोटेस्ट याचिकेवर युक्तिवाद होणार आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात येणार आहे. अजित पवारांचं नाव वगळल्याबद्दल हा आक्षेप आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
advertisement
कांदा लागवडीत घट
कांद्याबाबत केंद्राच्या शासनाचे धरसोड धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी निराश झाला आहे. सतत हस्तक्षेप आणि वारंवार अचानक करण्यात येत असलेली निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे पाठ फिरवू लागला आहे. परिणामी यंदा नाशिक जिल्हा, महाराष्ट्रचं नव्हे तर देशपातळीवर कांदा लागवडीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज धारशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले असताना मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत.
advertisement
49 वर्षानंतर जगप्रसिध्द पैलवान उतरणार चंद्रपूरातील दंगलीत
1975 साली चंद्रपूरातील कोहिनूर तलावाच्या मैदानावर जगप्रसिध्द पैलवानात मुकाबला झाला होता, यानंतर आता आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आणि हरियाणा केसरी जस्सा छोटा या जगप्रसिध्द पैलवानांच्या लढतीचे 17 फेब्रुवारी 2024 ला महाकाली मंदिराच्या पटांगणात आयोजन होणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Political News : शिखर बँकेचं भूत पुन्हा अजितदादांच्या मागे लागणार? राज्यातील महत्त्वाच्या 5 घडामोडी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement