मुंबईतील बोरीवली परिसरात असलेल्या भीमनगर, गोराई- 1 भागात बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने आपल्या पत्नीची क्रूरपणे हत्या केली. बोरीवली पोलीस स्टेशनमधील पोलीसांना घटनेची माहिती सायंकाळी 5 वाजता मिळाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना बुधवारी सायंकाळी हत्येची माहिती मिळाली. पतीनेच पत्नीची हत्या केल्यामुळे परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी ज्या ओमराज (आरोपी) आणि त्याची मुलगी हे दोघेही दरवाजाजवळ उभे होते. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडून होती.
advertisement
ओमराज आणि त्याची मुलगी असतानाच लगेचच पोलिसांनी घरात जाऊन व्यवस्थित चौकशी केली. घरात जाऊन चौकशी केली असता ओमराजची पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. तिचे तोंड अर्धवट उघडे होते. आसपास रक्ताचे डागही त्यांना दिसले. पोलिसांनी ओमराजची चौकशी केली असता, मीच तुम्हाला फोन करून घटनेबद्दलची माहिती दिली आहे. ती महिला माझी पत्नी आहे. तिने माझ्याविरोधात न्यायालयात केस दाखल केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती माझा छळ करत आलीये. तिने माझ्याशी भांडण केलेय. म्हणूनच मी तिचा गळा आवळला आणि तोंडावर बुक्क्या मारल्या. "
