नेमके काय घडले?
नवीना उपाध्याय (वय 25) ही एका हॉटेलमध्ये स्टीवर्ड म्हणून काम करते. ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीसोबत माहीमला जाण्यासाठी पार्ले येथील बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. त्याच वेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आली आणि तिच्याशी बोलू लागली. त्याने तिला जोगेश्वरीला सोबत नेण्याची आणि एकत्र नाश्ता करण्याची ऑफर दिली. नवीना वारंवार नकार देत असतानाही तो व्यक्ती तिथून हलला नाही.
advertisement
बसमध्ये चढताना काळ आला होता, पण आईने...
दरम्यान नवीना बेस्ट बस क्रमांक 40 मध्ये चढत असताना त्या व्यक्तीने अचानक मुलीचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच नवीना ताबडतोब बसमधून उतरली त्या व्यक्तीपासून स्वतःची सुटका करून घेतली आणि मुलीला घट्ट मिठी मारली.
मुलीला पळवणारा आरोपी स्थानिकांच्या तावडीत
घटनेनंतर नवीना यांनी तातडीने आपल्या पतीला घटनास्थळी बोलावले. आरोपीने लोकांची दिशाभूल करण्यासाठी ती मुलगी आपलीच असल्याचा खोटा दावा केला. मात्र स्थानिक रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
