Axis My India ने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंदाज वर्तवला आहे. मुंबई पालिकेत दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्यावर एकत्र आले असले तरी ५८ ते ६८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. शिवसेना आणि मनसेच्या शिवशक्ती युतीला ३२ टक्के मतदान मिळणार असं भाकित Axis My India ने आपल्या पोलमध्ये वर्तवला आहे.
तर त्याच ठिकाणी भाजप आणि शिवसेना महायुतीला १३१ ते १५१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. महायुतीची मतांची टक्केवारी ही ४२ टक्के असणार आहे.
advertisement
तर काँग्रेस-वंचित आघाडीला १२ ते १६ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला १३ टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तर इतरांना ६ ते १२ जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.
मेगा पोलने एक्झिटमध्ये ठाकरे बंधूंना 59 जागा
तर, नेटवर्क १८ च्या सीएनएन न्यूज मेगा पोलने एक्झिटचा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवशक्तीला ३५ टक्के मतदान मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. या मतदानाच्या टक्केवारीनुसार, ठाकरे बंधूंना ५९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
