सायबर फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने संचार साथी हा डिजिटल पोर्टल सुरु केला आहे. या पोर्टलवर तुम्ही सहजपणे तुमच्या नावावर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत ते तपासू शकता. या पोर्टलचा उपयोग करून लोकांना त्यांच्या मोबाईल नंबरची सुरक्षा सुनिश्चित करता येते आणि ओळख चोरीपासून बचाव करता येतो.
एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड असू शकतात?
advertisement
भारत सरकारने एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड नोंदवता येतील यासंबंधी स्पष्ट नियम ठरवले आहेत. सामान्य नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ सिमकार्ड ठेवण्याची परवानगी आहे. ही मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण होते.
काही राज्यांतील वेगळा नियम
भारतभर नऊ सिमकार्ड ठेवण्याची परवानगी असली तरी काही राज्यांमध्ये ही मर्यादा कमी आहे. जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्य राज्यांमध्ये एका व्यक्तीच्या नावावर सहा सिमकार्डपेक्षा जास्त नोंदवू शकत नाहीत. यामुळे स्थानिक नियमांचे उल्लंघन टाळणे गरजेचे आहे.
दंड किती?
जर एखाद्याने नियम मोडला आणि जास्त सिमकार्ड ठेवले, तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागतो. पहिल्यांदा नियम मोडल्यास 50,000 रुपये दंड तर पुन्हा नियम मोडल्यास 2 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
संचार साथी पोर्टल
तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी संचार साथी पोर्टलला भेट देणे सोपे आणि सुरक्षित उपाय आहे. या पोर्टलवर नोंदणी करून तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची माहिती सहज तपासू शकता आणि अनधिकृत सिमचा धोका टाळू शकता.