TRENDING:

Mumbai Shocking News : बाथरूमबाहेरून चिमुरडीचा आक्रोश! आई घरात असतानाच ....; घटनेने मुंबई हादरली

Last Updated:

Bhayandar Shocking Incident : भाईंदरमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वजण हादरुन गेले. तिथे शाळेती निघालेल्या चिमुकलीने आईला जे सांगितल त्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं ते एका पाहा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भाईंदर परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
shocking incident from Mira Road
shocking incident from Mira Road
advertisement

जानेवारीची 'ती' भयाण दुपार

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत ३० जानेवारी रोजी दुपारी शाळेसाठी निघण्याच्या तयारीत होती. शाळेत जाण्याची वेळ झाल्याने मुलीची आई कपडे बदलत असताना अचानक बाथरूमबाहेरून मुलीच्या जोरजोरात रडण्याचा आवाज आला. बॅड ट असे ओरडत ती घाबरलेल्या अवस्थेत बाथरूमच्या दरवाज्यावर थापा मारत होती.

आईने तात्काळ दरवाजा उघडून पाहिले असता मुलगी बाथरूमचा दरवाजा घट्ट पकडून उभी होती. घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर मुलीने इमारतीत प्लंबरचे काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचे सांगितले.

advertisement

नराधमाला बेड्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

या घटनेनंतर कुटुंबीयांनी तत्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Shocking News : बाथरूमबाहेरून चिमुरडीचा आक्रोश! आई घरात असतानाच ....; घटनेने मुंबई हादरली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल