कोणत्या पदासाठी असेल भरती
या भरतीद्वारे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विविध पदांवर नेमणुका करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये प्रोडक्ट हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर यांसारख्या उच्च पदांचा समावेश आहे.
'या' तारखेपर्यंत करा अर्ज
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे. म्हणजेच इच्छुक उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आहे. उमेदवारांनी अर्ज SBI च्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in/careers या लिंकवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
advertisement
या प्रक्रियेद्वारे एकूण 103 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 750 शुल्क भरावे लागेल, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
शैक्षणिक पात्रता
येथे प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव वेगळा आहे.
1)प्रोडक्ट हेड पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएशन आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेले असावे तसेच १५ वर्षांचा अनुभव फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रात असावा.
2)रिजनल हेड पदासाठी ग्रॅज्युएशन आणि 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
3)रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ग्रॅज्युएशनसह संबंधित क्षेत्रातील 8 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.
4)इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी एमबीए, पीजीडीएमसह किमान 5 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
पगार अन् अन्य सुविधा कोणत्या असतील?
या भरतीतील पगार पॅकेजेस अत्यंत आकर्षक आहेत.
1)प्रोडक्ट, इन्व्हेस्टमेंट आणि रिसर्च हेड पदासाठी वार्षिक CTC १ कोटी ३५ लाख इतका असेल.
2)झोनल हेड पदासाठी ९७ लाख रुपये
3)रिजनल हेड पदासाठी ६६.४० लाख रुपये
4)इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट पदासाठी ४४.५० लाख रुपये
5)इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी २७.१० लाख रुपये
6)तर सेंट्रल रिसर्च टीम पदासाठी २०.६० लाख रुपयेवार्षिक पगार निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा, अनुभव आणि पात्रतेबाबत सविस्तर माहिती SBI च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. तरुणांसाठी ही एक उत्तम करिअर संधी असून, स्थिर आणि उच्च पगाराच्या नोकरीसाठी आजच अर्ज करा.
