कोणत्या पदासाठी होणार भरती?
पोलीस आयुक्त कार्यालयाने एकूण 527 विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि बॅण्डस्मन या पदांचा समावेश आहे.
सध्या नवी मुंबई पोलीस दलात अंदाजे 4500 पोलीस कर्मचारी आणि 350 अधिकारी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्वतंत्र विमानतळ पोलीस ठाणे आणि उलवा पोलीस ठाणे स्थापन करण्यात आली आहेत. त्याशिवाय अजून तीन नवीन पोलीस ठाण्यांचा विस्तारही होणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार पोलीस दलात अधिक मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे.
advertisement
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तीन नवीन परिमंडळ रचना केल्यानंतर, शहरातील सुरक्षेचा स्तर वाढवण्यासाठी या भरतीची गरज असल्याचे सांगितले आहे. या भरतीमुळे नवी मुंबई पोलिसांचे सुरक्षा जाळे आणखी मजबूत होणार आहे.
कधी आणि कसा करायचा अर्ज?
भरती प्रक्रियेनुसार पोलीस शिपाईच्या 439 जागा, चालक पोलीस शिपाईच्या 82 जागा, आणि बॅण्डस्मनच्या 6 जागा उपलब्ध आहेत. सर्व पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 अशी आहे.
पोलीस भरती संबंधित अधिक माहिती इथे पाहा
या भरतीसंबंधी सर्व सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेचे तपशील policerecruitment2025.mahait.org तसेच mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. या भरतीमुळे नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचे बळ वाढणार असून, नव्या पिढीला पोलीस सेवेत सहभागी होण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
