TRENDING:

मोठी बातमी! भाजपकडून मनसेलाही युतीमध्ये येण्याची ऑफर?

Last Updated:

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपकडून मनसेलाही महायुतीमध्ये सहभागी होण्याची ऑफर देण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 14 ऑगस्ट, विशाल पाटील :  मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून मनसेलाही युतीसाठी ऑफर देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये स्वतः पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना या गोष्टीचा खुलासा केला आहे.
News18
News18
advertisement

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून आपल्याला युतीसंदर्भात ऑफर आहे. मात्र आपण अजून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलेलो नाहीत. आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. अजित पवार देखील महायुतीमध्ये आलेले आहेत, त्यांचं काय करणार? त्यामुळे अंतिम निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्श करताना म्हटल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवार, अजित पवार भेटीवर प्रतिक्रिया

advertisement

दरम्यान या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून देखील खोचक टोला लगावला आहे. हे एकमेकांना मिळालेले आहेत. मी आधीच तुम्हाला बोललो होतो त्यांची एक टीम गेली आणखी एक टीम जाईल. आपल्या राज्याची प्रतारणा होणार नाही, याची काळजी आमच्या पक्षाकडून घेतली जाईल अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी या भेटीवर दिली आहे.

advertisement

मी तेव्हाच सांगितलं होतं...; अजितदादा, शरद पवार भेटीचा राज ठाकरेंकडून समाचार

महापालिका निवडणुकीवर प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

महापालिकांच्या निवडणुका लांबल्या आहेत, यावर देखील राज ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. आताची राजकीय परिस्थिती पाहाता महापालिका निवडणुका होतील असं वाटत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर चर्चा झाली अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! भाजपकडून मनसेलाही युतीमध्ये येण्याची ऑफर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल