आकडे समोर आले आहेत. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर एक्झिट पोलमध्ये मिळाले आहे. मुंबईत भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं JVC एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे.मुंबईत भाजप आणि महायुती आणि ठाकरे यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे.
मुंबई महानगरपालिकेत भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट आहे. भाजपला मुंबईत 137 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला 59 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसचा 23 आणि इतर पक्षाला 6 जागा मिळू शकतात, असं JVCच्या एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे.
advertisement
मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक
2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 84 आणि भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना 59, भाजपला 137 जागा मिळाल्या आहेत. 25 वर्षापासून मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती. 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठआकरे यांच्या ताब्यात दिली होती. मुंबई महापालिकेच्य सत्तेचा दरवाजा उघडणारी चावी भाजपच्या हाती लागण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. मुंबई महानगपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे.
मनसेला मुंबईत किती जागा?
JVC एक्झिट पोलनुसार भाजपला 44 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 35 टक्के, काँग्रेसच्या 14 टक्के जागा येण्याची शक्यता आहे. भाजपचा आकडा जो एक्झिट पोलने दिला आहे तो भाजप आणि शिवसेना शिंदे युतीसह आहे. तर उद्धव ठाकरेंच्या जागा या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या युतीचा आहे.
