125 जागा मागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांन दिली आहे.
एकीकडे भाजपनं 150 जागांवर तयारी सुरु केली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून 125 हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 125 जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. 2012 आणि 2017 चे मिळून 125 नगरसेवक सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. या आधारे 125 जागा मिळाव्यात अशी प्राथमिक मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाकरे गटातील सर्वाधिक नगरसेवक
शिंदे गटाने केलेल्या दाव्यानुसार, 123 माजी नगरसेवकांपैकी 76 माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आहेत. हे नगरसेवक 2012 ते 2017 च्या कार्यकाळातील आहेत. त्यापैकी 2017-2022 या कार्यकाळातील सर्वाधिक 44 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. तसेच 2012-2017 या कार्यकाळातील 33 माजी नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठा दावा केला आहे. गेल्या तीन वर्षांत विविध पक्षांतील तब्बल 123 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक सामील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पेच महायुती कशी सोडवणार?
काही दिवसांपूर्वी शिंदेंकडून नुकताच दिल्ली दौरा करण्यात आला आहे. ज्यात समसमान वाटप मुंबई महापालिकेसाठी व्हावं अशी मागणी शिवसेनेच्या गोटातून होताना दिसली. अशातच दिवाळीचे फटाके जरी फुटले असले तरी आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. अशात, जागावाटपा आधीच महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेदाचे फटाके फुटताना दिसू शकतात. हा पेच महायुती कशी सोडवणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
हे ही वाचा :
