BMC Election, Udhav Thackeray Shiv sena UBT : मुंबई महापाकिलेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते.यासाठी सगळ्याच पक्षानी निवडणूकीच्या जोरदार तयारी सूरू केली आहे. या तयारी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबीटीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाच्या महिला नेत्या आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार तयारी सूरू केली आहे. या तयारी दरम्यान आता भाजपने ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याला गळाला लावल्याचे समजते. कारण ठाकरे गटाच्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास दादरच्या वसंतस्मृतीमध्ये मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडणार असल्याची माहिती खास सुत्रांकडून मिळत आहे.
तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.त्या गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची माहिती मिळत आहे. या नाराजीतून त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा झटका बसणार आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्विनी घोसाळकर यांच्या वॉर्ड क्रमांक 1 यंदा ओबीसी आरक्षित झाला.त्यामुळे घोसाळकर यांनी यंदा निवडणूक लढवू शकणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र त्या पालिकेच्या वॉर्ड क्रमाक 7, 8 किंवा 2 मधून निवडणूक लढवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. ठाकरे गटात नाराज झालेल्या तेवस्विनी घोसाळकर यंदा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढणार असस्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
