दुसरीकडे 15 जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, म्हणून बुधवारी शाळा ऑनलाईन पद्धतीने होतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.
मुंबईमध्ये बऱ्याच शाळा या मतदान केंद्र आहेत, तर काही मुख्य शाळांच्या शेजारीच मतमोजणी केंद्र ठेवण्यात आल्या आहेत. 15 तारखेला मतदान पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 4:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईमध्ये बुधवारी शाळा बंद, पण... अभ्यास करावा लागणार! पालकांनो आताच जाणून घ्या मोठी अपडेट
