TRENDING:

Ganesh Visarjan : मुंबईकरांनो, बाप्पाला निरोप देताय? समुद्र किनाऱ्यावर सावध राहा, 'ते' पुन्हा आले

Last Updated:

Ganesh Visarjan : गणेशोत्सव कालावधीत विसर्जनस्थळी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 20 सप्टेंबर : काल बुधवारी वाजतगाजत आणलेल्या दीड दिवसांच्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मुंबईत समुद्रकिनारी गणेशभक्तींनी मोठी गर्दी केली आहे. तुम्हीही मुंबईच्या समुद्रकिनारी बाप्पांचे विसर्जनासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लु बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर अधिक दिसून येत असल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईकरांनो बाप्पाला निरोप देताय?
मुंबईकरांनो बाप्पाला निरोप देताय?
advertisement

मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असून या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन व संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन व संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाताना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे.

advertisement

‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’च्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जारी मार्गदर्शक सूचना

1) गणेश विसर्जन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे.

2) गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.

3) पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

4) नागरिकांच्या जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चौपाट्यांवर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे.

advertisement

5) लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी.

वाचा - Gautami Patil : महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या गौतमीला पुढील काही दिवस 'या' जिल्ह्यात नाही लावता येणार ठुमके

मत्स्यदंश आणि प्रथमोपचार

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी केले आहे.

advertisement

  • ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
  • ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
  • जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
  • जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
  • advertisement

  • मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
  • जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

मराठी बातम्या/मुंबई/
Ganesh Visarjan : मुंबईकरांनो, बाप्पाला निरोप देताय? समुद्र किनाऱ्यावर सावध राहा, 'ते' पुन्हा आले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल