जाणून घ्या सविस्तर माहिती
अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
पदांची माहिती
शिपाई,हमाल,फराश: 887 जागा
वाहन चालक: 37 जागा
लिपिक: 1,332 जागा
स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी): 56 जागा
स्टेनोग्राफर (वरिष्ठ श्रेणी): 19 जागा
नोकरीचे ठिकाण आणि वेतन
advertisement
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे होईल. पदानुसार वेतन 16,600 ते 1,77,500 पर्यंत असेल. याशिवाय शासनाच्या नियमांनुसार इतर भत्तेही लागू असतील.
शैक्षणिक पात्रता
शिपाई,हमाल: किमान 7 वी उत्तीर्ण
वाहन चालक: वैध LMV लायसन्स, किमान 3 वर्षांचा अनुभव, वाहन देखभाल ज्ञान आणि शारीरिक तंदुरुस्ती
लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट; कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
स्टेनोग्राफर (कनिष्ठ): पदवी आणि इंग्रजी शॉर्टहँड 80 शब्द,मिनिट आणि टायपिंग 40 शब्द,मिनिट
स्टेनोग्राफर (वरिष्ठ): किमान 5 वर्षांचा अनुभव आणि इंग्रजी शॉर्टहँड 100 शब्द,मिनिट आणि टायपिंग 40 शब्द,मिनिट
वयोमर्यादा
लिपिक आणि शिपाई: खुला प्रवर्ग 18–38 वर्षे, राखीव प्रवर्ग 18–43 वर्षे
स्टेनोग्राफर आणि वाहन चालक: खुला प्रवर्ग 21–38 वर्षे, राखीव प्रवर्ग 21–43 वर्षे
सरकारी आणि उच्च न्यायालय कर्मचाऱ्यांना नियमानुसार सवलत
अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया
अर्ज शुल्क: 1000 रुपये
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि आवश्यकतेनुसार कौशल्य/व्यक्तिमत्त्व चाचणी
अर्ज कसा कराल?
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाइन भरावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.
